धक्कादायक : विमानात कोरोनाग्रस्त बसला अन् सर्व 289 प्रवासी रुग्णालयात दाखल 

coronavirus one person was positive kochi-dubai flight offloaded 289 passengers
coronavirus one person was positive kochi-dubai flight offloaded 289 passengers

कोची Coronavirus: भारतात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 107 झाली आहे. गेल्या आठवडाभरात कोरोनाग्रस्त रुग्ण झपाट्याने वाढले आहेत. भारतात कोरोनाचा पहिला रुग्ण केरळमध्ये सापडला होता. केरळमध्ये रुग्णांवर योग्य उपचार होत असले तरी, तेथील विमानतळावर अतिशय काटेकोरपणे रुग्णांची तपासणी केली जात आहे. अशा एका फ्लाईटमध्ये कोरोनाग्रस्त रुग्ण आढळल्यानंतर मात्र एअरपोर्टवरील कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली.

कोची येथून दुबईला जाणाऱ्या एका विमानात 289 प्रवासी बसले होते. या संदर्भात पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, विमानातील एक प्रवासी कोरोनाग्रस्त असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर संपूर्ण विमानच खाली करण्यात आले. आता सर्व प्रवाशांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कोरोनाची लागण झालेला संबंधित नागरिक ब्रिटनचा रहिवासी आहे. त्याला कोरनाची लागण झाल्यानंतर त्याच्यावर मुन्नारमध्ये उपचार सुरू होते. पण, तेथील सुविधांवर नाराज असलेल्या रुग्णाने तेथून पळ काढला होता. दुबईमार्गे तो ब्रिटनला पळून जाण्याच्या तयारीत होता. केरळमधील आरोग्य यंत्रणा आणि प्रशासन, सुरक्षा यंत्रणेने त्या रुग्णाचा माग काढला आणि त्याला रुग्णालयात दाखल केलं. पण, त्याच्या या कृत्यामुळं आता 289 जणांना कोरोनाची लागण होण्याचा धोका निर्माण झाला आहे.

कोरोनाग्रस्त तरुण गेला मॉलमध्ये
केरळमध्ये कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह झालेला तरुण एका मॉलमध्ये जाऊन आल्याची माहिती आहे. त्रिशूरमध्ये हा प्रकार धडला असून, त्यानं मॉलला भेट देऊन सिनेमाही पाहिला तसच त्यानं एका साखरपुड्याच्या कार्यक्रमालाही हजेरी लावली होती. जवळपास 350 जण त्या तरुणाच्या संपर्कात आल्याची माहिती आहे. त्यामुळं केरळ सरकारची आरोग्य यंत्रणा हादरली आहे. संबंधित तरुणाच्या चुलत भावाच्या आठ महिन्यांच्या बाळाला कोरोनाची लक्षणं आढळल्यामुळं त्याला विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलंय.

स्थानिक निवडणुका रद्द
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर आंध्र प्रदेशमध्ये स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका पुढं ढकलण्यात आल्या आहेत. आंध्र प्रदेशात या महिन्यात 21, 23, 27 आणि 29 तारखेला स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका होणार होत्या. परंतु, राज्य निवडणूक आयोगाने या निवडणुका सहा आठवड्यांसाठी पुढं ढकलण्यात आल्याची घोषणा केली. निवडणुकीच्या पुढच्या तारखा कोरोनाचं संकट दूर गेल्यानंतर जाहीर करण्यात येतील, असंही स्पष्ट करण्यात आलंय.

भारतात कोरोनाचे शंभरावर रुग्ण
दरम्यान, भारतातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 107 झाली आहे. शनिवारी रात्री महाराष्ट्रात आणखी पाच कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढली आहे. महाराष्ट्रात सध्या कोरोनाग्रस्तांची संख्या सर्वाधिक 31 झाली आहे. पुणे, मुंबई, नागपूर आणि यवतमाळ या ठिकाणी कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढली आहे. उत्तर प्रदेश, बिहार, महाराष्ट्र यांच्या पाठोपाठ हिमाचल प्रदेश सरकारनेही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा, कॉलेजना सुटी जाहीर केली आहे. मात्र, शाळा, कॉलेजमधील परीक्षा वेळापत्रका नुसारच होणार असल्याचे म्हटले आहे.

जेलमध्ये मास्क तयार
कोरोना व्हायरसच्या प्रसारामुळं मास्कचा तुटवडा पडण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर केरळमधील एका जेलमध्ये मास्क बनविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. तिरुअनंतपुरममधील या जेलमध्ये मास्कचे पहिल्या टप्प्यातील  उत्पादन राज्याच्या आरोग्य विभागाकडे सूपूर्द केले आहे. मुख्यमंत्री पी. विजयन यांनी ही माहिती दिली. त्यांनी आपल्या ऑफिशिअल ट्विटर अकाऊंटवरून मास्कचा फोटोही शेअर केलाय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com