Corona Virus : सांगा आम्ही जगायचे कसे ? कष्टकरी, कामगाराचा आर्त सवाल

Labors And Workers Are Worried about survival in 20 days Lockdown
Labors And Workers Are Worried about survival in 20 days Lockdown

पुणे : पावभाजीच्या स्टॉलवर मी कामाला जाते, तिथे भांडी घासण्याचे काम झाल्यानंतर रोज 350 रुपये मिळतात. पण कोरोनामुळे स्टॉल बंद झाला, आता पैसे नाहीत, घरातील रेशन संपले आहे, कुठे कामही करता येत नाही, घरातील 8-10 जणांचे पोट भरायचे कसे ? तुम्हीच सांगा आता आम्ही जगायचे कसे ? असा प्रश्न उपस्थित केला आहे, घोरपडे पेठेत राहणाऱ्या रेखा चौधरी या महिलेने. तिच्यासाख्या हजारो गरीब, कष्टकरी, हातावर पोट असणाऱ्या नागरीकांचे आता जगणे अक्षरश: मुश्किल झाल्याचे भयावह वास्तव पुढे येऊ लागले आहे.

coronavirus: कोरोनामुळं डॉक्टरांची प्रॅक्टिसही बदलली; कन्सल्टन्सीची नवी आयडिया 
खासगी कारवर चालक म्हणून काम करणाऱ्या दशरथ उघडे यांचीही परीस्थिती यापेक्षा वेगळी नाही. खडकवासल्याजवळ राहणारे उघडे हे खासगी कारवर चालक म्हणून काम करतात उघडे यांच्या कुटुंबातही 8-10 जण आहेत. त्यांच्या उदरनिर्वाह उघडे यांच्या पगारातुनच होते. परंतु कोरोनामुळे शहरात संचारबंदी आहे. त्यामुळे उघडे यांच्या गाडीची चाकेही गेल्या 5 दिवसापासून थांबली आहेत. 3-4 दिवस पुरेल एवढेच धान्य त्यांच्याकडे आहे. त्यापुढे अंधार आहे. या परिस्थितीमध्ये कुटुंबाला घेऊन गावी जाणे हा एकमेव पर्याय त्यांच्या पुढे होता. मात्र संचारबंदी, पैशांची चणचण, पेट्रोल न मिळण्यामुळे त्यांचे गावाकडे जाण्याचे दोरही आता कापले गेले आहेत. त्यामुळे "घरातील इतक्या लोकांचे पोट कसे भरु, कदाचित ही संचारबंदी वाढली, तर कसे जगायचे असा प्रश्न उघडे यांनी उपस्थित केला आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
घरकामगार, कचरावेचक, गवंडी, मजूर, छोटे-मोठे विक्रेते, कारचालक, ट्रक,बसचे ड्रायव्हर, क्लीनर अशा हातावर पोट असणाऱ्या एका मोठ्या समुदायाची आतापासुनच जगण्यासाठीची धडपड सुरु झाली आहे. आणखी 4-5 दिवस ते कशा तरी पद्धतीने या परीस्थितीशी तोंड देऊ शकतील,त्यानंतर पुढचे 20 दिवस त्यांच्यावर उपासमारीची वेळ आल्याशिवाय राहणार नसल्याचे एक दुर्दैवी चित्र दिसु लागले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवस संपूर्ण देश 'लॉकडाऊन' करण्याचा निर्णय जाहीर केला. त्यानंतर नागरीकांची जीवनावश्यक वस्तु खरेदी करण्यासाठी किराणा दुकानांवर अक्षरश: झुंबड उडाली. नोकरदार, हातात पैसे असणाऱ्यांनी बाजारातून तात्काळ वस्तु खरेदी केल्या. मात्र ज्यांचा उदरनिर्वाह दररोज किंवा आठवडयाला मिळणाऱ्या पगारावर अवलंबून आहे. त्यांच्यावर मात्र परीस्थितीसमोर हतबल होण्याची वेळ आल्याचे वेदनादायी चित्र दिसत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com