Corona Virus : आता शाळांच्या प्रवेशाचेही 'लॉकडाऊन'

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 9 April 2020

शिक्षण हक्क कायद्यानुसार पहिली ते आठवी या वर्गातील विद्यार्थी अनुत्तीर्ण होत नाही. मात्र ते ज्या वर्गात आहेत, त्यापुढील वर्गात प्रवेश घेण्याची प्रक्रिया शाळेत येऊन पूर्ण करावी लागते. आता लॉकडाऊनचा काळ सुरू असल्याने पालक आणि शिक्षकही शाळेत येऊ शकत नाही. तसेच बहुसंख्य शाळांमध्ये ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया होत नाही. परिणामी अनेक शाळांमध्ये प्रवेश प्रक्रिया रखडण्याची शक्यता आहे.​

पुणे : राज्यात सर्वत्र शाळा बंद आहेत. यापुढे राज्यातील लॉकडाऊनचा काळ वाढण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे पुढील शैक्षणिक वर्षाचे प्रवेश कसे करावेत, हा प्रश्न शाळांपुढे आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

राज्य शिक्षण मंडळाशी संलग्न शाळांमधील पूर्वप्राथमिक प्रवेश प्रक्रिया मार्च महिन्याच्या अखेरीस सुरू होते. परंतु कोरोनाच्या प्रादुर्भाव वाढल्याने शाळांना सुट्टी देण्यात आली. त्यामुळे प्रवेश प्रक्रियेचा प्राथमिक टप्पा देखील सुरू झालेला नाही. विद्यार्थी, त्यांचे पालक हे शाळेत येऊ शकत नसल्याने प्रवेश निश्चित कसे करायचे, याची चिंता शाळांना आहे.

Coronavirus : लॉकडाऊनमध्येही तुम्हाला करता येणार परराज्यात प्रवास
शिक्षण हक्क कायद्यानुसार पहिली ते आठवी या वर्गातील विद्यार्थी अनुत्तीर्ण होत नाही. मात्र ते ज्या वर्गात आहेत, त्यापुढील वर्गात प्रवेश घेण्याची प्रक्रिया शाळेत येऊन पूर्ण करावी लागते. आता लॉकडाऊनचा काळ सुरू असल्याने पालक आणि शिक्षकही शाळेत येऊ शकत नाही. तसेच बहुसंख्य शाळांमध्ये ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया होत नाही. परिणामी अनेक शाळांमध्ये प्रवेश प्रक्रिया रखडण्याची शक्यता आहे.

Corona Virus : परवानगीसाठी पोलिस ठाण्यात फेऱ्या मारणारा 'तो' व्यावसायिक कोरोनाबाधित

सीबीएसईच्या शाळांनी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू केली आहे. याबाबत निगडीतील सिटी प्राइड स्कूलच्या संचालक डॉ. दीपाली सवाई म्हणाल्या, "केंद्रीय मंडळाशी संलग्न शाळांमध्ये प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन होतात. गणवेष आणि शुल्क भरण्यास पालकांना शाळेत यावे लागते. परंतु आम्ही प्रवेश ऑनलाइन पद्धतीने केले असून, शुल्कही ऑनलाइन घेतले आहे. ज्या पालकांना आता शुल्क भरणे शक्य नाही, त्यांना एप्रिल अखेरपर्यंत मुदतवाढही दिली आहे.

विठ्ठलवाडीतील गोसावी विद्यालयाचे मुख्याध्यापक चंद्रकांत मोहोळ म्हणाले, की राज्य मंडळाच्या नववी आणि अकरावीच्या परीक्षांबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. त्यामुळे त्या पुढील वर्गांतील प्रवेशाचा निर्णय घेता आलेला नाही. लॉकडाऊनमुळे पहिली ते आठवीचे प्रवेशही कसे करायचे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. या संबंधी शालेय शिक्षण विभागाने तातडीने मार्गदर्शकतत्वे जारी केली पाहिजेत.

Corona Virus : पुण्यात आणखी ४ जणांचा मृत्यू; मृतांचा आकडा पोहोचला...

लॉकडाऊन संपेपर्यंत कोणत्याही शाळांना पालकांकडे शुल्क वसुलीचा तगादा लावू नये असा शासनाचा आदेश आहे. त्यामुळे शाळांनी प्रवेश प्रक्रिया देखील लॉकडाऊननंतर सुरू कराव्यात.
- दत्तात्रय जगताप (प्राथमिक शिक्षण संचालक)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Now School Admission is also pending till lockdown over