esakal | Corona Virus : लॉकडाऊनमध्ये आरएसएस उभारणार ३९४ आपदा मदत केंद्रे
sakal

बोलून बातमी शोधा

RSS will set up in the 394 Disaster Help Centres in Lockdown due to coronaVirus.jpg

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दैनंदिन शाखेतील स्वयंसेवक, कार्यकर्ते आपातकालीन परिस्थितीत मदतीसाठी पुढे येताना दिसत आहेत. या परिस्थितीमध्ये नागरिकांना आवश्यक ती मदत पुरविण्यासाठी संघ कार्यकर्त्यांकडून पुण्यातील विविध भागात ३९४ आपदा मदत केंद्रे तयार करण्यात आली आहेत. 

Corona Virus : लॉकडाऊनमध्ये आरएसएस उभारणार ३९४ आपदा मदत केंद्रे

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावला रोखण्यासाठी राज्यात सरकारने कलम जमाव व संचारबंदी लागू केल्याने पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्र येण्यास मज्जाव आहे. यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दैनंदिन शाखेतील स्वयंसेवक, कार्यकर्ते आपातकालीन परिस्थितीत मदतीसाठी पुढे येताना दिसत आहेत. या परिस्थितीमध्ये नागरिकांना आवश्यक ती मदत पुरविण्यासाठी संघ कार्यकर्त्यांकडून पुण्यातील विविध भागात ३९४ आपदा मदत केंद्रे तयार करण्यात आली आहेत. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
या मदत केंद्रांमधून सुमारे दीड ते तीन हजार संघाचे प्रशिक्षित स्वयंसेवक, कार्यकर्ते सहभागी झाले असून त्यांचे संपूर्ण नियाेजन ऑनलाइन बैठकांद्वारे होते आहे. 

- 'नमस्ते, तुम्ही स्वत:ची काळजी घेत आहात ना?' पंतप्रधानांनी केली पुण्यातील नर्सेसची विचारपूस!

बेघर, असंघटित क्षेत्रातील मजुर, कामगार अशांच्या भाेजनाची व्यवस्था करणे, स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी, महाविद्यालयीन विद्यार्थी, एकटे रहाणारे ज्येष्ठ नागरिक यांच्यापर्यंत जेवणाचे डबे, औषधी पुरवणे अशा प्रकारची मदत स्वयंसेवकांकडून केली जात आहे. तसेच शाखा व ‘बालगाेकुलम’ या उपक्रमा अंतर्गत ४ ते १२ वयाेगटातील मुलांसाठी घरातच ऑनलाइन सेशन्सची व्यवस्था करण्यात आली आहे. ज्यात प्रश्नमंजुषा, चित्रकला स्पर्धा, देशभक्ती गीत पाठांतर स्पर्धा, सुभाषित पाठांतर स्पर्धा, सुर्यनमस्कार, योग प्रात्यक्षिके व स्पर्धा, विज्ञान कथांचे वाचन असे वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येत आहेत. तसेच तंत्रज्ञानस्नेही स्वयंसेवकाकडून 'झूम' ऑनलाइन अॅपच्या माध्यमातून दरराेजच्या संघ प्रार्थनेसाठी ठराविक वेळी कार्यकर्ते एकत्रित येत आहेत. 

- शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी; पीककर्ज परतफेडीला मुदतवाढ!

रक्तसंकलन अभियानाअंतर्गत सुमारे आठ हजार रक्तपिशवी करणार संकलीत

जनकल्याण रक्तपेढी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने रक्तसंकलन अभियान राबविण्यात येत आहे. राज्यात रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे हा अभियान हाती घेण्यात आला असून 23 जून 2020 पर्यंत सुमारे आठ हजार रक्तपिशवी संकलित करण्याचे लक्ष ठेवण्यात आले आहे. प्रत्येक आठवड्याच्या शनिवार व रविवार हे रक्तदान अभियान होणार आहे. यासाठी पुणे पोलीस व जनकल्याण रक्तपेढीद्वारे पूर्व परवानगीने रक्तदात्यांना पत्र उपलब्ध करून दिले आहे. कोरोना संसर्गाचा वाढत असलेल्या प्रमाणामुळे बहुतांश रक्तदान शिबीरे रद्द झाली आहेत. उन्हाळ्यात रक्तपेढीमध्ये रक्तसंकलनावर मोठा परिणाम होत असतो, त्यामुळे रक्त व रक्तघटकांची गरज भासणाऱ्या रुग्णांना ते उपलब्ध होत नाही. यासाठी जनकल्याण रक्तपेढीने आवश्यक ती काळजी घेऊन गर्दी न करता रक्तपेढीत रक्तदान करण्याची तयारी केल्याची माहिती रक्तपेढीचे कार्यकारी संचालक डाॅ.अतुल कुलकर्णी यांनी दिली.

- विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; 'नीट' परीक्षेस स्थगिती!

"कोरोना विषाणूच्या वाढत असलेल्या संसर्गामुळे राष्ट्रीय आपत्ती निर्माण झाली आहे. यासाठी आरएसएस तर्फे पुणे शहर, उपनगरे व भोवतालच्या छोट्या गावांमध्ये आपदा मदत केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. या केंद्राच्या माध्यमातून खासगी किराणा, भाजीपाला दुकाने , पुणे महापालिकेने सुरू केलेले भाजीपाला विक्री केंद्र अशा गर्दीच्या ठिकाणी 'सोशल डिस्टन्सिंगसाठी' उपाययोजना व त्यासंबंधित नागरिकांचे प्रबोधन केले जाणार. तसेच, बेघर नागरिक, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, पोलीस व प्रशासकीय यंत्रणेतील कर्मचारी या सर्वांसाठी भोजन पोहोचवण्याची व्यवस्था अशा विविध कामांमध्ये संघ कार्यकर्ते स्वयंसेवक म्हणून सक्रिय झाले आहेत."
- महेश करपे, कार्यवाह - राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ,पुणे महानगर.

Corona Virus : लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या कर्नाटक राज्यातील 450 कामगारांना दिलासा

loading image
go to top