हवाई क्षेत्राला कोरोनाचा फटका; पुणे विमानतळावरुन दररोज २०-२५ विमाने रद्द | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pune Airport

हवाई क्षेत्राला कोरोनाचा फटका; पुणे विमानतळावरुन दररोज २०-२५ विमाने रद्द

देशभर कोरोनाने पुन्हा एकदा डोके वर केले आहे. महाराष्ट्रासहीत पुण्यात कोरोना रूग्णांची संख्या झपाट्याने वाढतेय. अशात सर्व क्षेत्रावर कोरोनाचा परिणाम दिसून येत आहे. प्रामुख्याने हवाई क्षेत्राला याचा मोठा फटका बसला आहे. याच पार्श्वभूमीवर पुणे विमानतळावरुन रोज जवळपास २०-२५ उड्डाणे रद्द केली जात आहे.

हेही वाचा: सात वर्षात पेट्रोल-डिझेल सर्वात महाग, नागरिकांना झटका!

कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे प्रवासी संख्या कमी होत आहे. त्यामुळे विमानसेवा देणाऱ्या कंपन्या विमाने रद्द करीत आहे. विशेष म्हणजे रद्द करणाऱ्या उड्डाणांमध्ये जयपूर आणि दिल्लीच्या विमानांचा अधिक समावेश असल्याचे समोर आले आहे. पुणे विमानतळावरुन जवळपास २०-२५ उड्डाणे रद्द केली जात असल्याने याचा परिणाम अप्रत्यक्षरीत्या अन्य बाबींवर होत आहे.

हेही वाचा: इम्रान खान सरकारच्या अडचणीत वाढ, 150 लोकप्रतिनिधींचे सदस्यत्व रद्द

पुणे विमानतळावरून काही दिवसांपुर्वी ७०-८० विमानांची वाहतूक होत होती, त्यावेळी जवळपास १८ हजार प्रवासी संख्या होती. आता मात्र २०-२५ उड्डाणे रद्द केल्याने प्रवासी संख्या जवळपास ११ हजार वर आली आहे. कोरोना रूग्णसंख्या वाढत असल्याने प्रवासी विमानप्रवास टाळत आहे आणि याचा मोठा फटका तिकिट बुकींगवर झालाय. काही विमानांची तिकिट बुकींगची संख्या पाचच्या घरात असल्याने विमानसेवा देणाऱ्या कंपन्याना नाईलाजाने विमाने रद्द करावी लागत आहे.

Web Title: 20 25 Daily Flights Cancelled From Pune

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top