Coronavirus : युरोपीय राष्ट्रांनीही केली 'लॉकडाऊन'ला सुरवात

EU external borders to close from Tuesday
EU external borders to close from Tuesday

बर्लिन : कोरोनाचं जाळं जगभर पसरलेलं असतानाच अनेक देशांनी लॉकडाऊन सुरू केले आहे. सइतर देशातील नागरिक आपल्या देशात येऊ नये व कोरोना पसरू नये यासाठी सगळेच देश प्रयत्न करत आहेत. अशातच युरोपातील काही देशांनीही हळूहळू आपल्या सीमा बंद करण्यास सुरवात केली आहे. युरोपीय आयोगाच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डर लेन यांनी कोणत्या सीमा, कोणत्या नियमांखाली बंद करणार याबाबतची माहिती ट्विट करून दिली आहे. 

युरोपातील अनेक देशांनी आतापर्यंत आपल्या सीमा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, जर्मनीनेही आता काही प्रमाणात देशात येणारी वाहतूक कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. जर्मनीला असणाऱ्या फ्रान्स, ऑस्ट्रीया आणि स्वित्झर्लंड या देशातून येणारी वाहतूक कमी करण्याचा निर्णय जर्मानीने घेतला आहे. युरोपने सीमा बंद करण्याचा निर्णय घेतला असला तरी, देशांतर्गत वाहतूक सुरळीतपणे चालेल, तसेच बाजारपेठाही खुल्या राहतील, असे उर्सुला यांनी सांगितले. 

मात्र, देशांच्या सीमा बंद केल्याने सामानाची ने-आण करणाऱ्या ट्रक, गाड्यांसमोर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. हजारो बसेस आणि ट्रकचालक देशांतर्गत सीमेवर अडकले आहेत. त्यामुळे आरोग्याचा प्रश्न उद्भवत असून, पुरवठ्यावर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.  जर आता सीमा रोखून वाहतूक बंद केल्यास बाजारातील सामानाचा तुटवडा जाणवेल त्यामुळे काही प्रमाणात वाहतूक सुरू राहिल व काही ठिकाणी बंद राहील असेही उर्सुला यांनी सांगितले. 

जर्मनसह शेजारील राष्ट्रे पोलंड, झेक रिपब्लिक, डेन्मार्क या देशांनीही अनेक बंधने घालत देशांच्या सीमा बंद केल्या आहेत. मात्र, देशांतर्गत व्यवहार व्यवस्थित सुरू राहिल याकडे सर्व युरोपीय राष्ट्रांचे प्रयत्न आहेत.  

फ्रान्सचे पंतप्रधान इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी सोमवारी (ता. १६) संध्याकाळी जाहीर केले की, कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी फ्रान्सने आपल्या सर्व सीमा मंगळवारपासून वाहतूकासठी बंद केल्या आहेत. पुढील ३० दिवसांसाठी युरोपातील कोणत्याही वाहतूकीसाठी फ्रान्सच्या सीमा बंद राहतील असे त्यांनी सांगितले. 

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी 
महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचा प्रादूर्भाव प्रचंड प्रमाणात पसरला असून, राज्यातील पहिल्या कोरोनाग्रस्त रूग्णाचा मृत्यू झाला आहे. आज (ता. १७) मुंबईतील कस्तुरबा रूग्णालयात ६४ वर्षीय व्यक्तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. कोरोनाचा महाराष्ट्रातील पहिलाच बळी असल्याने राज्यात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. आतापर्यंत देशात ३ मृत्यू झाले असून, राज्यातील हा पहिलाच बळी आहे. 

मृत पावलेले व्यक्ति नुकतेच दुबईहून परतले होते. गेले काही दिवस ते कोरोनावरील उपचार घेत होते. मात्र, या उपचारांना यश न मिळाल्याने आज त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या पत्नीलाही कोरोनाची लागण झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे मुंबईतील नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे. भारतात रूग्णांचा आकडे १२७ वर गेला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com