Coronavirus : दानशूर आनंद महिंद्रा; कोरोनाग्रस्तांना केली एवढी मदत

Industrialist Anand Mahindra will help to Coronavirus patients
Industrialist Anand Mahindra will help to Coronavirus patients

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसने जगभरात मृत्यूचे थैमान घातलेलं असतानाच सगळ्याच देशातून कोरोनाशी सामना करण्यासाठी सज्ज आहे, मुकाबला करत आहे. भारतातही आरोग्य विभाग व सर्व हॉस्पिटल उत्तम प्रकारे काम करत आहेत. देशात केवळ अत्यावश्यक सेवाच सुरू राहतील, इतर कार्यालये व सेवा बंद ठेवण्यात यावे असा निर्णय सर्व राज्य सरकारने दिला असून त्याप्रमाणे नागरिकही सूचनांचे पालन करताना दिसत आहेत. तसेच एकिकडे कोरोनावर मात करण्यासाठी हजारो हात पुढे येत असताना, उद्योजक आनंद महिंद्रा यांनीही कौतुकास्पद पाऊल उचलले आहे. 

महिंद्रा अँड महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी ट्विट करत सध्याच्या परिस्थितीबाबत काळजी व्यक्त केली आहे. महिंद्रा यांनी व्हेंटिलेटर्स बनवणे, महिंद्रा हॉलिडेचे रिसॉर्ट शासनाला मदतीसाठी देणे, तसेच स्वतःचे १०० टक्के वेतनही कोरोनाग्रस्तांना देण्याचे महिंद्रा यांनी जाहीर केले आहे. महिंद्रा यांनी रविवारी याबाबत पाच ट्विट करत माहिती दिली. त्यांनी ट्विटमध्ये म्हणलंय की, 'भारत कोरोनाच्या तिसऱ्या टप्प्यात पोहोचलं आहे. त्यामुळे कोरोनाग्रस्तांच्या संख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. यासाठी लॉकडाऊन हाच उत्तम पर्याय आहे. मेडिकल क्षेत्रावरील दबाव कमी व्हावा यासाठी महिंद्रा कंपनी व्हेंटिलेटर्स तयार करण्याचा विचार करत आहे. तसेच तात्पुरती सोय म्हणून महिंद्रा हॉलिडे रिसॉर्ट सरकारला देण्यास तयार आहोत. तसेच आमची प्रोजेक्ट टीम शासन किंवा लष्कराला मदत करण्यासही तयार आहे. तसेच मूी माझे १०० टक्के वेतन हे कोरोनाग्रस्तांच्या उपचारासाठी देणार आहे.' असे ट्विट महिंद्रा यांनी केले आहे. 

दरम्यान, कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारने घेतलेल्या लॉकडाऊनचा निर्णय नागरिक गांभीर्याने घेत नाहीत. राज्य सरकारने नियमांचे पालन करावे, असे ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com