Coronavirus : 'कोरोनावर उपाय सुचवा आणि 1 लाख मिळवा'; मोदींचे आव्हान

वृत्तसंस्था
मंगळवार, 17 मार्च 2020

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनावरील उपाय कोणाकडे असल्यास त्या व्यक्तिला १ लाखाचे बक्षीस जाहीर केले आहे.  'COVID – 19 Solution Challenge' असे या चॅलेंजचे नाव असून, जो कोणी कोरोनावर जालीम उपाय सुचवेल त्याला एक लाखांचे बक्षीस मिळेल.

नवी दिल्ली : सध्या देशासह जगभरात कोरोनाने थैमान घातले असून त्यासाठी सर्वच देश अनेक प्रकारच्या उपाययोजना करत आहे. भारत सरकारनेही असेच जागरूक पाऊल उचलले आहे. थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनावरील उपाय कोणाकडे असल्यास त्या व्यक्तिला १ लाखाचे बक्षीस जाहीर केले आहे.  'COVID – 19 Solution Challenge' असे या चॅलेंजचे नाव असून, जो कोणी कोरोनावर जालीम उपाय सुचवेल त्याला एक लाखांचे बक्षीस मिळेल.

Coronavirus: साथीच्या रोगांमुळे जागतिक अर्थव्यवस्था होते डळमळीत; ३७ लाख कोटींचे वार्षिक नुकसान

पंतप्रधान मोदी यांनी काल संध्याकाळी एक ट्विट केले. या ट्विटमध्ये त्यांनी एक लिंक शेअर केली आहे. या लिंकवर क्लिक केल्यानंतर आपण थेट केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वेबसाईटवर जातो. या पेजवर या चॅलेंजसंदर्भातील माहिती दिली आहे. सरकारनेही सर्व नागरिकांना कोरोनापासून बचावासाठी काळजी घेण्याचे आव्हान केले आहे. तसेच कोणाकडे कोरोनापासून बचावण्याचा उपाय असल्यास या संकेतस्थळावर कळवा असे आवाहनही या पेजवर करण्यात आले आहे. 

आता बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पेजवरील माहिती -
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून आवश्यक ती पावलं उचलली जात आहेत. नागरिकांच्या पाठिंब्यामुळे आम्ही कोरोनाचा सामना करण्यासाठी सक्षम आहोत. सर्व नागरिकांकडून आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या सूचनांचं पालन करण्यात येत आहे. करोनाला रोखण्यासाठी तांत्रिक मदत देणाऱ्यांचेही स्वागत आहे. कोरोनाविरोधी लढ्यात सहभागी व्हा, असे या पेजवर सांगितले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: PM Modi challenges that give solution on Corona and get 1 Lakh