मांजरामुळे रक्तरंजित संघर्ष; तुंबळ हाणामारीत २ महिलांसह ८ जण जखमी | Fight because of Cat | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

People Fight Because of Cat in Meerut
मांजरामुळे रक्तरंजित संघर्ष; तुंबळ हाणामारीत २ महिलांसह ८ जण जखमी | Fight because of Cat

मांजरामुळे रक्तरंजित संघर्ष; तुंबळ हाणामारीत २ महिलांसह ८ जण जखमी

मांजरामुळे मेरठमध्ये तुंबळ मारामारी (People fight Because of Cat in Meerut):

मांजर पाळायला अनेकांना आवडतं. त्यामुळेच मांजरांचे व्हिडीओ सोशल मीडियावर प्रंचंड व्हायरल होत असतात. अनेक गुडमॉर्निंग आणि गुडनाईटच्या मॅसेजमध्ये मांजरांचे गोंडस फोटो आपल्याला पाहायला मिळतात. परंतु अशाच एका गोंडस मांजरामुळे मेरठमध्ये रक्तरंजित संघर्ष झाला. मेरठमधील लिसारी गेटच्या शालीमार गार्डनमध्ये पाळीव मांजराच्या चाव्यावरून झालेल्या तुंबळ मारामारीत दोन महिलांसह आठ जण जखमी झाले. दरम्यान मारहाण करणाऱ्या दोन्ही गटांनी परस्परविरोधी तक्रार पोलिस ठाण्यात (Police Complaint) दाखल केली आहे.

हेही वाचा: Video: गायींसाठी चक्क घरातच स्पेशल बेडरूम; बेडवरच झोपतात गायी!

मेरठमधील (Meerut) शालिमार गार्डन येथील गल्ली नंबर ५ मध्ये रफिक हा नावाचा व्यक्ती राहतो. रफिकने आपल्या घरात 8-10 मांजरी पाळल्या आहेत. यातील एका मांजरीने आठवड्यापूर्वी तेथील रहिवासी असलेल्या शहजाद याची मुलगी आयशा हिच्यावर हल्ला केला होता. यानंतर शहजाद आणि रफिकच्यात वाद झाला होता. रविवारी दुपारी रफिकच्या मांजराने पुन्हा शहजादच्या घरात घुसून पत्नी श्यामा हिच्यावर हल्ला करून जखमी केले. या प्रकरणाबाबत सायमा आणि तिची मुलगी रफिकच्या घरी गेल्या. यावेळी रफिकची मुले षडयंत्र, आबिद आणि आझाद यांनी सायमाला मारहाण केल्याचा आरोप आहे.

बचावासाठी आलेल्या आयशालाही बेदम मारहाण करण्यात आली. जीव वाचवण्यासाठी या दोघीही शेजारच्या साबीरच्या घरात घुसले. यावर आरोपींनी दोघींनाही ओढत ओढत रस्त्यावर नेले. यानंतर परिसरातील लोक या मायालेकींच्या मदतीसाठी आले आणि स्थानिक लोकांनी रफिकच्या मुलांना बेदम मारहाण केली.

हेही वाचा: VIDEO: सॅल्युट! इंडियन आर्मीच्या वीर जवांनाचं New Year सेलिब्रेशन बघाच

या गदारोळात श्यामा, तिची मुलगी आयशा, फईम आणि किराणा दुकान चालवणारे फैसल, अजीम यांच्यासह परिसरातील दोन तरुण जखमी (Injured) झाले. याशिवाय दुसऱ्या बाजूचे साजिद, आबिद आणि आझाद हे तिघे भाऊ जखमी झाले. सर्वांना जिल्हा रुग्णालयात (District Hospital) दाखल करण्यात आले. दोन्ही पक्षांनी एकमेकांवर आरोप करत फिर्याद दिली आहे.

सीओ कोतवाली अरविंद चौरसिया यांनी सांगितले की, घटनेची माहिती मिळताच पोलिसांना तपास करण्याचे निर्देश दिले आहेत. या घटनेचा व्हिडीओ काही लोकांनी काढला असून तो मिळवण्याचा पोलिस प्रयत्न करत आहेत. तपासानंतर कारवाई केली जाईल असेही त्यांनी सांगितले.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :crimePolice StationCat
loading image
go to top