बारमध्ये भांडण आणि खून : नोएडामध्ये नेमकं काय घडलं ?

त्यांची पबच्या कर्मचाऱ्यांसोबत पैशांवरून मारामारी झाली. यात एक तरूण जखमी झाला.
lost lemons
lost lemonsgoogle

मुंबई : नोएडातील गौतम बुद्ध नगरमधील गार्डन्स गॅलरीया मॉलमध्ये सोमवारी रात्री एका तरुणाला मारहाण करून त्याची हत्या करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मॉलमधील लॉस्ट लेमन्स पबमधील कर्मचाऱ्यांशी त्या तरुणाचा आणि त्याच्या मित्रांचा वाद झाला होता. हे प्रकरण हाणामारीपर्यंत पोहोचलं.

lost lemons
बारमध्ये गर्दी जमवणे भोवले, मालकाला ३० हजारांचा दंड

मृत व्यक्ती ३० वर्षांची असून त्याचे नाव ब्रजेश राय असे आहे. तो मूळचा बिहारचा होता व सध्या सेक्टर ७६मध्ये राहात होता. बारचे कर्मचारी आणि बाऊन्सर्ससह एकूण १६ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही चित्रीकरण ताब्यात घेण्यासह ब्रजेशच्या मित्रांचेही जबाब नोंदवले आहेत.

lost lemons
पूर्ववैमनस्यातून दोन गटात मारामारी

बारमध्ये हत्या झाल्याचे पुरावे मिळालेले नाहीत. बारमध्ये मारहाण झाल्यानंतर जखमी व्यक्तीला रुग्णालयात नेण्यात आले. बार नियमांनुसार चालवला जात नसेल तर त्यावरही कारवाई केली जाईल असे पोलिसांनी सांगितले आहे. सध्या पबला प्रतिबंधित करण्यात आले आहे.

त्या रात्री काय घडले ?

लॉस्ट लेमन्स पबमध्ये काही तरूण रात्री ११ वाजता पार्टी करण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांची पबच्या कर्मचाऱ्यांसोबत पैशांवरून मारामारी झाली. यात एक तरूण जखमी झाला. त्याला रुग्णालयात नेले असता तेथेच त्याचा मृत्यू झाल. पोलिसांनी याबाबत ट्विटरवरून माहिती दिली आहे.

बाऊन्सर्सची भूमिका संशयास्पद

पोलीस सीसीटीव्ही चित्रीकरणाचा तपास करत आहेत. पबमधील गर्दीचे नियोजन करण्यासाठी आणि बेधुंद ग्राहकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी बाऊन्सर्सची नेमणूक केलेली असते; मात्र इथे बाऊन्सरच ग्राहकांवर तुटून पडले. त्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली नाही. ब्रजेशचा मृत्यू झाल्यानंतरच पोलिसांना कळवण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com