Akshaya Tritiya 2023 : अक्षय्य तृतीयेला पार पडतो कोल्हापुरच्या अंबाबाईचा दलोत्सव; पहा कसा असतो हा सोहळा!

Akshaya Tritiya 2023
Akshaya Tritiya 2023 esakal

 Akshaya Tritiya 2023 : प्राचीन कोल्हापूरात वसलेली श्री अंबाबाईचा उल्लेख पुराणातही सापडतो. येथील मंदिर बरेच प्राचीन असल्याचे बोलले जाते. कोकणातून राजा कर्णदेव कोल्हापुरात आला त्यावेळी मूर्ती एका लहान मंदिरात होती. कर्णदेवाने भोवतालचे जंगल मोकळे केले. सतराव्या शतकांनतर तत्कालीन अनेक बड्या व्यक्तींनी मंदिरात येऊन अंबाबाईचे दर्शन घेतल्यानंतर हे महाराष्ट्राचे दैवत झाले. मंदिराच्या परिसरात जवळपास 35 लहान-मोठी मंदिरे व 20 दुकाने आहेत.

वास्तुशास्त्रीय बांधणीनुसार चालुक्य राजवटीत मंदिराचे बांधकाम झाले असावे. हे मंदिर हेमाडपंथी शैलीत बांधण्यात आले असून मंदिरावर पाच कळस आहेत. मुख्य मंदिरास लागूनच गरूड मंडप आहे.

अंबाबाई संपूर्ण राज्याचं कुलदैवत आहे. त्यामुळे प्रत्येक वर्षी नवरात्रीत कोल्हापूर हाऊसफुल झालेलं असतं. केवळ नवरात्रीच नाही तर वर्षातील इतर अनेक प्रसंगी, सण समारंभाला करवीर निवासीनीच्या दर्शनाला हजारो भाविक उपस्थिती लावतात.

Akshaya Tritiya 2023
Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेच्या दिवशी करा 'या' मंत्रांचा जप, माता लक्ष्मी होणार प्रसन्न

साडे तीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय्य तृतीयेच्या दिवशी एक खास सोहळा पार पडतो.आजच्या दिवशी अंबा माता झोपाळ्यावर विराजमान होते. या सोहळ्याला ‘अक्षय्य तृतीयाची चैत्री हिंदोळा पूजा’असेही म्हणतात.

अक्षय्य तृतीया दिवशीच्या सांयकाळी कोल्हापुर वासियांची आई अंबाबाई झुल्यावर बसते. संध्याकाळी चार वाजले की देवीचे चोपदार वाजंत्री आईला बोलावण करायला गाभाऱ्यात जातात.  तोवर इकडे गरुड मंडपात चांदीनं मढवलेलं सिंहासन  फुलांनी सजवून चारी बाजूंनी दोऱ्या बांधून गरुड मंडपाच्या लाकडी छताला बांधल जातं.

आजच्या दिवशी महिला भाविक देवीचं रूप पहायला गर्दी करतात
आजच्या दिवशी महिला भाविक देवीचं रूप पहायला गर्दी करतातesakal

साधं खणाच वस्त्र नेसून आई साहेब पुजाऱ्यांच्या हातातून सनई ताशाच्या नादात मंडपात येतात. रथोत्सवा प्रमाणे हवालदार खांडेकर दागिने घेऊन हजर होतात. आज अंबाबाई जगन्माता  म्हणून नाही तर एखाद्या नवपरिणीते प्रमाणं सगळ कोडकौतुक करून घेते.

हा सोहळा याची देही याची डोळलै
हा सोहळा याची देही याची डोळलैesakal
Akshaya Tritiya 2023
Akshay Kumar: बॉक्स ऑफिसवर धडाधड सिनेमे आपटत असतानाच अक्षयच्या नव्या सिनेमाच्या पोस्टरनं वेधलं लक्ष

साज ,चाफेकळी, मोहनमाळ, तन्मणी अशा अनेक पारंपरिक दागिन्यांबरोबर तीचा खास रत्नजडीत किरीट कुंडलं  असे दागिने घालते. देवीचा शृंगार पूर्ण झाला की पुजाऱ्यांच्या घरच्या स्त्रीयां , देवीच्या शागिर्दाने देवस्थानच्या स्वयंपाकघरातला तसेच आपल्या घरुन आणलेली कैरीची डाळ, पन्हं पानसुपारी  अंबा मातेला अर्पण करून गरुड मंडपात येतात. मग सुरू होतो करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या चैत्री हळदीकुंकवाचा सोहळा.

चोपदार झोके देतायत आणि आई अंबाबाई सनई चौघड्याच्या तालावर  मंद झुलतेय. रात्री आठ वाजेपर्यंत हा सोहळा असाच रंगतो. महिला येतात हळदीकुंकू करतात. दरवर्षी हा सोहळा मोठ्या भक्ती भावात संपन्न होतो.

दलोत्सवाचा अर्थ काय

हा दोलोत्सव अर्थात हिंदोळा हे प्रतिक आहे बदलत्या सृष्टी चक्राचं. झोपाळ्यावर बसून झुलणारी जगदंबा मूर्त रुप आहे. या सृष्टीचं जिला वसंत ऋतूच्या रुपानं नवनिर्मितीची चाहूल लागली आहे. तिचा सृजनाचा सोहळा चैत्राला सुरू झाला. म्हणून एखाद्या नवयुवती प्रमाणे ती झोपाळ्यावर बसून झुलतेय.

देवीसाठी खास आकर्षक झुला कयार
देवीसाठी खास आकर्षक झुला कयारesakal
Akshaya Tritiya 2023
Akshay Tritiya 2023 : अक्षय्य तृतीयेला धनप्राप्तीसाठी करा हे 6 सोपे उपाय, पैशांची चणचण होईल दूर

हा नवनिर्मितीचा सोहळा पूर्ण होईल. अश्विनाला जेव्हा भरलेल्या पिकासह ती आपलं जगन्माता हे नाव सार्थ करेल. पण आज ती कुणाची स्वामिनी नाही. असुर मर्दिनी नाही तर आज ती आहे एक सृजनाला आतुर मुग्धा, आपल्याच विश्वात रमलेली सौंदर्यवती मानिनी असते.

अंबामातेचे हे रूप पहायला संपूर्ण पंचक्रोशीतून महिला येतात. लाडक्या लेकीला झोका द्यावा तसे मातेचे कोड कौतुक करतात. देवीला घरातून आणलला नैवेद्य दाखवतात. अशा रितीने अंबामातेचा हा सोहळा संपन्न होतो.  

Akshaya Tritiya 2023
Akshay Tritiya : मुद्रणालयातर्फे सोन्या-चांदीची नाणी सर्वांसाठी उपलब्ध

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com