Angarki Sankashti Chaturthi : 'या' चतुर्थिची कथा माहितीये? जाणून घ्या

कृष्ण पक्षाची चतुर्थी ही मंगळवारी अर्थात गणपतीच्या वाराला अंगारकी संकष्टी चतुर्थी म्हणतात आणि गणपतीच्या वाराच्या दिवशी ही चतुर्थी आल्यामुळे हा दिवस अधिक महत्त्वाचा ठरतो.
Angarki Sankashti Chaturthi
Angarki Sankashti Chaturthiesakal

Angarki Sankashti Chaturthi : महिन्यातून दोन चतुर्थी येतात. कृष्ण पक्षाची चतुर्थी म्हणजे संकष्टी आणि शुक्ल पक्षाची चतुर्थी म्हणजे विनायकी चतुर्थी असे सांगितले जाते. अंगारकी संकष्टी चतुर्थीचा अनेक जण उपवास करतात. खरं तर दर महिन्याला संकष्ट चतुर्थी येते. पण त्यातही अंगारकी संकष्टी चतुर्थीला अधिक महत्त्व देण्यात आले आहे. मात्र अंगारकीचे वेगळे महत्त्व आहे.

Angarki Sankashti Chaturthi
सायकल प्युअरचे संपूर्ण गणेश चतुर्थी पूजा किट

जेव्हा कृष्ण पक्षाची चतुर्थी ही मंगळवारी अर्थात गणपतीच्या वाराच्या दिवशी येते तेव्हा त्या दिवसाला अंगारकी संकष्टी चतुर्थी असे म्हटले जाते आणि गणपतीच्या वाराच्या दिवशी ही चतुर्थी आल्यामुळे हा दिवस अधिक महत्त्वाचा ठरतो. मंगळवाराच्या दिवशी चतुर्थी आल्यास, गणेशाच्या पूजेमध्ये मंगळाचा प्रभाव वाढतो असे ज्योतिषशास्रात सांगितलं जातं. याशिवाय पुराणात सांगितल्याप्रमाणे या दिवशी जी व्यक्ती गणपती पूजा करते अथवा उपवास करते, त्या व्यक्तीला गणेशाच्या कृपेसह योग्य आणि चांगली फलप्राप्ती होते.

Angarki Sankashti Chaturthi
एसटीची अष्टविनायक दर्शन यात्रा संकष्टी चतुर्थी पासून पुन्हा सुरू!

गणशेला पूजा समर्पित

ज्यांना दर महिन्याला संकष्टीचा उपवास करता येत नाही ते या दिवसाला आपली गणेशाप्रती भक्ती समर्पित करतात. तसंच आपली कामे मार्गी लागण्यासाठी, आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठीदेखील काही व्यक्ती या दिवशी उपवास करतात. अर्थात या गोष्टी तुमच्या श्रद्धेनुसार अवलंबून असतात. असे म्हटले जाते की, ब्रम्हांडातील मंगळ ग्रहाच्या पुण्य लहरी अंगारकी संकष्टीच्या दिवशी अधिक सहस्र पटींने पृथ्वीकडे आकर्षित होत असतात. त्यामुळे चंद्रदर्शन करून हा उपवास सोडल्यास, तुमच्या इच्छा पूर्ण होतात.

Angarki Sankashti Chaturthi
पंचांग 19 एप्रिल: आज अंगारकी संकष्टी चतुर्थी, करा 'या' मंत्राचा जप

अंगारकी चतुर्थी कथा

यामागची कथा तितकीच मनोरंजक आहे. कृतयुगामध्ये अवंती नगरीमध्ये वेदवेत्ते अग्निहोत्री ऋषी भरद्वाज नावाचे एक महान गणेशभक्त होते. त्यांनी त्या युगापासूनच मानवसृष्टीला गणेश पूजेचे महत्त्व पटवून दिले होते. तर या ऋषींकडूनच पृथ्वीच्या गर्भातून अंकारक नावाचा, जास्वंदी वृक्षाच्या सानिध्यात रक्तवर्णीय भौमपुत्र जन्माला आला होता असे सांगितले जाते. हा पुत्र सात वर्षांचा झाल्यावर पृथ्वीनं त्याला पुन्हा भरद्वाज ऋषींच्या स्वाधीन केले होते.

Angarki Sankashti Chaturthi
संकष्टी चतुर्थी निमित्त संगीत सभा

ऋषींनी त्याचे पालनपोषण केले, वेद शिकविले आणि गणेशमंत्र देऊन उपासना करायला सांगितलं. त्यानंतर हा मुलगा अरण्यात गेला. त्या मुलाने साधारण एक सहस्त्र वर्षे तप करून गणेशाला अर्थात आपल्या आराध्य दैवताला प्रसन्न करून घेतले. ज्या दिवशी गणपती त्याला प्रसन्न झाला तो दिवस म्हणजे अंगारकी संकष्ट चतुर्थी.

Angarki Sankashti Chaturthi
गणेश मूर्ती विक्री करणाऱ्या मित्रांवर चतुर्थी दिवशीच विघ्न!

या पुत्राने स्वर्गात राहून अमृतप्राशन केले आणि त्रैलोक्यात विख्यात व्हायचे वरदान प्रसन्न झालेल्या श्रीगणेशाकडे मागितले. तर प्रसन्न झालेल्या श्रीगणेशानेसुद्धा आपल्या परम भक्ताला हे वरदान दिले की, यापुढे भविष्यात येणाऱ्या मंगळवाराची संकष्टी चतुर्थी ही तुझ्याच अंगारीका या नावाने ओळखली जाईल आणि संबंधित उपासकाला २१ संकष्टी केल्याची फलप्राप्ती या चतुर्थीमुळे मिळेल. तसंच तुझ्या या सहस्र वर्षाच्या तपश्चर्येचे पुण्य युगानुयुगे त्या उपसकांमध्येही वाटले जाऊन त्यांच्या इच्छित मनोकामना पूर्ण होतील. ते ऋणमुक्त होतील.

Angarki Sankashti Chaturthi
चतुर्थी निमित्त महागणपतीला खरबूजांची आकर्षक आरास

अशाप्रकारे त्रैलोक्यात तू सुविख्यात होशील आणि तुझं नाव भूमिपुत्र म्हणून भौम, अकारका सारखा लाल आहेस म्हणून अंकाकर व शुभ करण्याची शक्ती असेल म्हणून मंगळ या नावे तुला ब्रम्हांडातल्या आकाशातील ग्रहांमध्ये स्थान मिळेल. याशिवाय तू सदैव अमृत प्राशन करशील. त्यामुळेच गणेशाच्या या वरदानामुळे अंगारकी चतुर्थीला अत्यंत महत्त्व प्राप्त झाले.

Angarki Sankashti Chaturthi
संकष्टी चतुर्थी निमित्त बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी पालीत भाविकांची गर्दी

त्यामुळेच ज्या गणेश भक्तांना प्रतिमासी येणाऱ्या संकष्टी चतुर्थीचे व्रत अथवा उपवास करणे जमत नसेल अशा व्यक्तींनी अंगारकी मात्र न विसरता आवर्जून करावी . याची फलश्रुती नक्कीच लाभणार असे वेदवचनही दिले गेल्याचे सांगण्यात येते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com