कालाष्टमी : समस्यांवर मार्ग हवा असेल तर 'या' मंत्राचं पठण करा! | kalasthami vrat 2022 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कालाष्टमी

कालाष्टमी : समस्यांवर मार्ग हवा असेल तर 'या' मंत्राचं पठण करा!

आज आषाढ महिन्यातील कालाष्टमी आहे.१२.१२ नंतर आषाढ कृष्ण सप्तमी पर्यंत असणार त्यानंतर अष्टमी सुरू होणार.ही अष्टमी कालाष्टमी असणार आहे. या कालाष्टमीला तुम्ही तुमच्या समस्येवर मार्ग काढू शकता. कालाष्टमीदरम्यान तुम्हाला काही पुजा अर्चना करावी लागणार त्यानुसार तुम्हाला फळ मिळणार. (ashadhi kalasthami vrat kala bhairava worship)

हेही वाचा: पंचाग 20 जुलै : हिरवे वस्त्र परिधान करणे आज शुभ ठरेल

शास्त्रानुसार समस्यांवर मार्ग मिळवण्यासाठी आज सायंकाळी काळभैरवाचे दर्शन घेऊन कालभैरव अष्टकांचे पठण करावे. याशिवाय“श्री कालभैरवाय नम:” या नाम मंत्राचा यथा शक्ती जप करावा.यामुळे तुमच्या आयुष्यातील समस्या दुर होतील आणि तुम्हाला नवे मार्ग सापडतील.

हेही वाचा: आजचे पंचांग आणि दिनविशेष - 20 जुलै 2022

आषाढ महिन्यातील कालाष्टमी आहे. आज सकाळी १० वाजून ४८ मिनिटांनी सूर्याने पुष्य नक्षत्रात प्रवेश केलाय. या दिवशी कालभैरवच्या पूजनाला खूप महत्व आहे. महादेवाचे एक रौद्र रूप म्हणजेच कालभैरव मानले जातात. त्यामुळे याचा जप करणे आपल्यासाठी उत्तम आहे आणि जीवनातील अडचणीपण नाहीशा होतील.

हेही वाचा: Shravan 2022 : देवाच्या पूजेत फुल का महत्त्वाची असतात,जाणून घ्या कोणत्या देवाला कोणते फुल आवडते...

कालाष्टमी पूजा पद्धत
कालाष्टमीच्या दिवशी कालभैरवाची मूर्ती शुभ ठिकाणी स्थापित करावी. त्यानंतर गंगेचे पाणी शिंपडून ते स्थान शुद्ध करुन घ्या, आता त्यांना फुले, नारळ, इमरती, पान इत्यादी अर्पण करा. भगवान कालभैरवासमोर धूप-दीव लावा यानंतर भैरव मंत्रांचा १०८ वेळा जप करा. शेवटी आरती करा. तुमची पुजा सपन्न होणार.

Web Title: Ashadhi Kalasthami Vrat Kala Bhairava Worship

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :FastworshipSanskruti