Astro Tips : तुमच्या हातावरच्या 'या' खुणा देता तुम्हाल ऐश्वर्य, लाभेल अंबानी, अदानीसारखं भाग्य

असं म्हणतात ज्यांच्या हातावर असं निशाण असतं ते करिअरमध्ये खूप प्रगती करतात.
Astro Tips
Astro Tipsesakal

Lucky Hashtag Sign on Palm : आपल्या तळहातात आपलं भविष्य असतं असं म्हटलं जातं. त्याचे अनेक अर्थ निघत असले तरी त्यातला एक महत्वाचा अर्थ म्हणजे हस्तरेषा. काही हस्तरेषा किंवा ठराविक खुणा हे तुमचं भाग्य व्यक्त करतात.

अशाच काही खुणांपैकी एक आहे हॅशटॅग साइन. यात आपल्या हातावरच्या काही ठराविक ठिकाणी दोन उभ्या आणि त्याला कापणाऱ्या दोन आडव्या रेषा # अशी खुण तयार करत असतील तर ते फार शुभ समजलं जातं.

चायनीज पामिस्ट्रीमध्ये अशा निशानाला गुडलक साइन किंवा शुभतेचे प्रतिक समजले जाते. असं म्हणतात की, ज्या लोकांच्या हातावर अशी खुण असेल ते लोक करिअरमध्ये फार प्रगती करतात. अशा भाग्यवान लोकांकडे धनाची काही कमी राहत नाही. मग ही खुण हातावर कुठेही असली तरी चालते.

Astro Tips
Astro Tips : रागावर नियंत्रण करून प्रगतीचे दार उघडतो हा रत्न

कधी मिळते उत्तम फळ

  • हस्तरेषा तज्ज्ञ म्हणतात ही खुण हृदयाच्या रेषेजवळ असेल तर हे लोक करिअरमध्ये फार प्रगती करतात.

  • या लोकांमध्ये लीडरशीप क्वालीटी असते.

  • जर ही खुण हृदय रेषा आणि भाग्यरेषेच्या मध्ये असेल तर हे लोक व्यवसायात प्रगती करतात.

  • जर ही खुण गुरुपर्वतावर म्हणजे तर्जनीच्या खालच्या उंचवट्यावर असेल तर अशा लोकांना पैशांची कधी कमतरता भासत नाही.

  • जर ही खुण बुध पर्वतावर म्हणजे करंगळीच्या खालच्या उंचवट्यावर असेल तर त्यांना फार सन्मान प्राप्त होतो.

  • यांचे पद आणि प्रतिष्ठा वाढत राहते.

  • शनिपर्वतावर म्हणजे मध्यमेच्या खालच्या उंचवट्यावर असेल तर मोठे अधिकारी होण्याचे संकेत असतात.

Astro Tips
Holi Astro Tips : ...म्हणून खेळतात धुळवड, होळीच्या राखेचे ७ फायदे

बोटांवर या खुणेचा अर्थ

तर्जनी - सरकारी नोकरीचे योग असतात. करिअरमध्ये पुढे राहून फार प्रगती करतात.

मध्यमा - करिअरमध्ये चांगली प्रगती करतात. यांना नशिबाची साथ लाभते. चांगले आनंदी जीवन जगतात.

अनामिका - हे लोक समाधानी असतात. यांच्याकडे फार पैसा नसला तरी नशिब यांना कायम साथ देतं. हे लोक बौद्धिक क्षमतेने यशस्वी होऊ शकतात.

करंगळी - असं म्हणतात फार कमी लोकांच्या करंगळीवर हे निशाण असतं. हे लोक कामाच्या ठिकाणी प्रगती करतात, खूप पैसा कमवतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com