Astrology : कसा जाणार तुमचा दिवस? 'या' राशींसाठी दिवस उत्तम नाही, तुमची रास यात आहे का?

काही राशींसाठी आजचा दिवस उत्तम नाही.
Horoscope and Astrology
Horoscope and AstrologySakal

Astrology : आज पाच मार्च. आजचा दिवस कसा जाणार, याची उत्सूकता प्रत्येकाला असेल पण तुम्हाला माहिती आहे का काही राशींसाठी आजचा दिवस उत्तम नाही. त्यामध्ये तुमचीही रास आहे का? आज आपण याविषयी जाणून घेणार आहोत. चला तर जाणून घेऊया. (Astrology rashibhavishya daily horoscope in marathi 5 march 2023)

मेष

मेष राशीसाठी आजचा दिवस तुगोंधळात टाकणारा असू शकतो. बोलताना सांभाळून बोला नाहीतर त्याचा चुकीचा अर्थ लावला जाऊ शकतो. मेहनतीचं फळ मिळणार नाही पण तरी तुम्ही आशावादी राहा.

सिंह

तुम्ही इतर लोकांना त्रास देऊ शकता. त्यामुळे कोणतेही काम करताना किंवा बोलताना सांभाळून बोला. कामाच्या ठिकाणी काम वाढेल सोबतच वादही वाढण्याची शक्यता आहे.

Horoscope and Astrology
Holi Astrology : होळीला 'हे' उपाय केल्याने पडेल पैशाचा पाऊस...

वृश्चिक

कोणताही निर्णय घेताना विचारपूर्वक घ्या नाहीतर त्याचा चुकीचा परिणाम होऊ शकतो. ऑफिसमध्ये अशांतता राहू शकते ज्याचा परिणाम तुमच्या कामावर होऊ शकतो.

कुंभ

घरच्या लोकांची काळजी घ्या. विशेषत: आईच्या तब्येतीची काळजी घ्या. आज तुमची प्रचंड चिडचिड होणार. रागावर कंट्रोल करा नाहीतर तुमच्या कडून समोरच्याचं मन दुखवू शकता.

Horoscope and Astrology
Kasba Chinchawad Bypoll Election बाबत Astrologer चा मोठं भाकीत | BJP Congress | Pune

मीन

मीन राशींसाठी आजचा दिवस त्रासदायक असणार. कुटूंबाची काळजी घ्या. गाडी चालवताना विशेष काळजी घ्यावी. आरोग्याबाबत विशेष खबरदारी घेणे गरजेचे आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com