Chhatpuja 2022 : जन्मताच मुलींचा व्हायचा मृत्यू ; गावातील पुरूषांनी छटपूजा केल्यावर मुलींना मिळाले जीवदान

घरात वंशाला दिवा पाहिजे या हट्टापायी घरात मुलगी जन्माला आली की तिला मारले जाते
Chhatpuja 2022
Chhatpuja 2022esakal

घरात वंशाला दिवा पाहिजे या हट्टापायी घरात मुलगी जन्माला आली की तिला मारले जाते. काही कोवळ्या जीवांचा तर गर्भातच बळी दिला जातो. एकीकडे हे चित्र असताना दुसरीकडे मुली जगाव्यात यासाठी बिहारमधील एका गावात पुरूषांनी छटपूजा करण्याची प्रथा पाडली आहे. जाणून घेऊयात काय आहे प्रकरण.

Chhatpuja 2022
Tulsi Vivah 2022 : तुळशी विवाहानंतरच का सुरु होते लग्नांची नांदी? जाणून घ्या शास्त्र काय सांगते...

उत्तर भारतीय लोकांच्या श्रद्धेचा मोठा सण छठपूजेचा आज दुसरा दिवस आहे. दरवर्षी कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षाच्या षष्ठी तिथीला छठ पूजा साजरी केली जाते. यावेळी ही पूजा ३० ऑक्टोबरला होणार आहे. विशेषत: बिहार, यूपी, झारखंडमध्ये हा सण साजरा करण्याचे विशेष महत्त्व आहे. सर्वत्रच केवळ महिला हे व्रत करतात. पण, एका गावात पुरूष हे व्रत आणि छटपूजाही करतात.त्याच्या मागे एक वेगळे आणि धार्मिक कारण आहे.

Chhatpuja 2022
Chhath Puja 2022 : पूर्वोत्तर भारतीय समाजाच्या छटपूजा व्रताला प्रारंभ

बिहारमधील कटोरिया तालूक्यात असलेल्या पिपराडीह गावात काही वर्षांपूर्वी मुलगी जन्माला आली की काही ना काही कारणाने तीचा मृत्यू होऊ लागला. डॉक्टर,दवाखाना करूनही गावातील मुलीच्या मृत्यूदरात काही फरक पडला नाही तेव्हा गावातील सर्वच लोक छट देवीच्या आश्रयाला गेले.

Chhatpuja 2022
Chhath Puja 2022: बॉलीवुडमधील हे बिहारी कलाकार साजरी करणार छट पूजा..

जन्माला आलेल्या मुलींना वाचवण्यासाठी लोकांनी खूप प्रयत्न केले. यानंतरही जेव्हा मुलींचे मृत्यू थांबले नाहीत. तेव्हा गावातील एका पुजाऱ्याने गावकऱ्यांना सल्ला दिला की, गावातील पुरुषांनी छठपूजा करावी. तरच येथील मुली सुरक्षित राहतील आणि गावात सुख-समृद्धी नांदेल.

Chhatpuja 2022
Chhat Puja 2022 : छट पूजेवरूनही वादाचे घट

तेव्हापासून ही परंपरा गावात सुरू असल्याचे सांगितले जाते. ‘पूर्वजांच्या या परंपरेचे पालन करण्यात एक आध्यात्मिक भावना आहे. त्याचा अनुभव शब्दात सांगता येणार नाही. आम्ही छठ व्रत केल्यानेच गावाचे भले होईल. गावावर येणारी सर्व संकटे दूर जातील, अशी भावना या गावातील पुरूषांनी व्यक्त केली. यामुळे त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात.

Chhatpuja 2022
Tulsi Vivah 2022: तुळशीचं लग्न शाळीग्राम दगडासोबत का लावलं जातं ?

पूर्वी महिला छटपूजा करायच्या पण गावावर आलेले संकट दूर होण्यासाठी महिलांनी ते बंद केले. काही महिलांना पूजा करण्यासाठी दुसऱ्या गावात जावे लागत होते. पण, आता मात्र अशी परीस्थिती नाही. गावात लग्न होऊन येणाऱ्या नववधू छटपूजा करतात.

Chhatpuja 2022
Bank Holidays November 2022 : नोव्हेंबरमध्ये बँकेची काम प्लॅन करताना आधी 'हे' वाचा

बिहारच्या समस्तीपूरच्या रघुनाथपूर गावातही फक्त पुरुषच छठ पूजा आणि उपवास करतात. येथे छठ उत्सवात महिला त्यांना मदत करतात. परंतु उपवासाच्या प्रत्येक नियमाचे पालन करून पुरुष उपवास आणि उगवत्या सूर्याला जल अर्पण करतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com