एकनाथ शिंदेंना एवढ्या सहजतेने मुख्यमंत्रिपद कसं मिळालं? ज्योतिषतज्ज्ञ म्हणतात...

आता एकनाथ शिंदे यांच्याकडे शिवसेना व अपक्ष असे फक्त ५० च्या आसपास संख्याबळ असताना त्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद गेल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला.
eknath  shinde
eknath shindesakal

गेले काही दिवसापासून महाराष्ट्राच्या राजकारणात प्रचंड अस्थिरता दिसून येत होती. या संदर्भात सर्वसामान्यांमधून विविध प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात होत्या. अनेकांकडून वेगवेगळे अंदाज बांधले जात होते. नक्की काय होणार याबद्दल प्रचंड उत्सुकता ताणली गेली होती.

एकनाथ शिंदे गटाचे लोकप्रतिनिधी सुरतमध्ये व नंतर गुवाहाटीमध्ये हॉटेलमध्ये थांबले होते. त्यानंतर तेथून ते गोव्याला गेले. त्यामुळे लोकांची उत्कंठा ताणली जात होती. (chief minister eknath shinde astrology bhavishya patrika prediction by expert ramanlal shah)

eknath  shinde
आत्महत्या मुक्त महाराष्ट्रसाठी 'हे' कायदे करा रद्द; मुख्यमंत्री शिंदेंना पत्र

शेवटी गुरुवारी राज्यपालांकडून एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री म्हणून व देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होणार आहेत असे सांगितल्यावर सर्वांनाच फार मोठा धक्का बसला, कारण देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार हे सर्वांनीच गृहीत धरले होते. आता एकनाथ शिंदे यांच्याकडे शिवसेना व अपक्ष असे ५० च्या आसपास संख्याबळ असताना त्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद गेल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला.

eknath  shinde
Amravati : पोलीस आयुक्तांवर कारवाई करा; नवनीत राणांचे अमित शहांना पत्र

श्री. एकनाथ शिंदे : ०९-०२-१९६४, (राशी कुंडली)

राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप या पक्षातील नेत्यांच्या पत्रिका जशा प्रचलित आहेत त्या पद्धतीत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या पत्रिका पुढे आल्याच नाहीत. एकनाथ शिंदे यांची पत्रिका अत्यंत बलवान आहे. मंगळ, शुक्र, राहू, केतू हे उच्च राशीत आहेत, गुरू व शनी हे स्वगृहीचे आहेत. गुरू व शुक्र यांची अधिकाराचे जे दहावे स्थान त्याच्यावर दृष्टी आहे व सध्याही गुरूची दहाव्या स्थानावर दृष्टी आहे. यामुळे त्यांना मुख्यमंत्रिपद लाभले.

एकनाथ शिंदे यांची पत्रिका एवढ्या मोठ्या प्रमाणावर बलवान आहे, की आगामी महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांचे प्रभुत्व मोठ्या प्रमाणावर राहणार आहे. आगामी काळात कोणाचेही मंत्रिमंडळ येऊ द्या, एकनाथ शिंदे यांना डावलून कोणालाही काहीही करता येणार नाही. एवढी त्यांची पत्रिका बलवान आहे. सध्याचे एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांचे बनलेले सरकार महाराष्ट्राला निश्चितपणाने प्रगतीपथावर घेऊन जाणार, यात शंका नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com