Diwali Bhaubeej 2022 : भावाला औक्षण करताना पुजेच्या ताटात 'या' वस्तू जरुर ठेवा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Diwali Bhaubeej 2022

Diwali Bhaubeej 2022 : भावाला औक्षण करताना पुजेच्या ताटात 'या' वस्तू जरुर ठेवा

Diwali Bhaubeej 2022 : दिवाळीच्या पर्वात भाऊबीज अत्यंत महत्त्वपुर्ण सण आहे. कार्तिक शुद्ध द्वितीयेला भाऊबीज सण साजरा केला जातो. यंदा 26 ऑक्टोबरला भाऊबीज साजरी केली जाणार आहे. भावाबहिणीच्या पवित्र नात्यातील गोडवा फुलविणारा हा सण.

यादिवाशी बहिण भावाला औक्षण करुन त्याच्या दीर्घायुष्य व उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करते. बहिण जेव्हा भावाला औक्षण करते त्यावेळी औक्षणाच्या ताटात असलेल्या प्रत्येक गोष्टीला एक विशेष महत्व आहे. त्यामुळे औक्षणाच्या ताटात विशेष महत्वाच्या या गोष्टी आवर्जून असायलाच हव्यात, सोबतच काय महत्व आहे या प्रत्येक गोष्टीचे तेही आपण जाणून घेऊया.

हेही वाचा: Bhaubeej 2022 : यंदाच्या भाऊबीजेला केवळ २ तासाचा शुभ मुहूर्त; जाणून घ्या लाडक्या भावाचे कधी करायचे औक्षण

हळद आणि कुंकू

हळद आणि कुंकू

कुंकू :

औक्षणाच्या ताटात कुंकू हे अत्यंत महत्त्वाचं आहे. कोणत्याही शुभकार्याची सुरुवात कपाळी टिळा लावून केली जाते. त्यामुळे ताटातील कुंकवानं भावाच्या माथी टिळा लावणं हे दिर्घायु सोबतच प्रतिष्ठेचं प्रतीक मानलं जातं.

हळद :

हळद ही आरोग्यदायक असते, याचसोबत हळद आणि कुंकू हे सौख्य- समृध्दीचे प्रतीक मानले जाते त्यामुळे पुजेच्या ताटात कुंकवासोबत हळद अवश्य ठेवावी.

हेही वाचा: Bhaubij 2022 : बहिणींनो, भाऊबीजेला करू नका या चुका, नाहितर...

अक्षता

अक्षता

अक्षता :

अक्षता म्हणजे औक्षवंत! अक्षता आयुष्याची वाढ करणारी असते असे पुराणात सांगितले आहे. त्यामुळे दिर्घायुष्याच्या प्राप्तीसाठी डोक्यावर अक्षता टाकल्या जातात. अखंड आहेत अशा अक्षता पुजेच्या ताटात असाव्या.

नाण सुपारी

नाण सुपारी

नाण- सोनं- सुपारी :

भावाच्या कपाळी कुंकूवाचा टिळा लावल्यानंतर नाण- सोनं- सुपारी ने औक्षण करावे. धन-धान्य समृध्दीचे प्रतीक अन् इडा-पिडा टळावी म्हणून या तिन्ही गोष्टींनी ओवाळावे. यासाठी ताटात रुपयाचे नाणे, सोन्याचा एखादा अलंकार (उदा.- अंगठी) आणि सुपारी ठेवावी.

हेही वाचा: Diwali 2022 : भाऊबीज साजरी करण्यामागचं धार्मिक कारण जाणून घ्या

नारळ (श्रीफळ)

नारळ (श्रीफळ)

नारळ :

नारळाला श्रीफळ म्हटले जाते. भावाच्या आयुष्यात सुख-समृद्धी कायम राहावी अशी प्रार्थना बहिण या दिवशी करते यामुळे औक्षणाच्या ताटात श्रीफळ (नारळ) जरुर ठेवावे.

दिवा

दिवा

दिवा :

आपला भाऊ औक्षवंत व्हावा यासाठी बहिण भावाला ओवाळते. वाईट शक्तींपासून भावाचे रक्षण व्हावे यासाठी ओवाळणीच्या ताटात दिवा असणं महत्त्वाचं आहे. दिव्याला सकारात्मकतेचे प्रतीक मानण्यात आलं आहे.

मिठाई

मिठाई

मिठाई :

कुठल्याही आनंदाच्या वेळी तोंड गोड केलेच पाहिजे. त्यामुळे यादिवशी औक्षण करताना भावाचे तोंड गोड करण्यासाठी ताटात मिठाई असणं आवश्यक आहे. बहिण-भावाच्या नात्यात कटुता निर्माण होऊ नये आणि त्यांच्या नात्याचा गोडवा कायम राहावा यासाठी ताटात मिठाईला महत्व आहे.

हेही वाचा: Astro Tips : घरामध्ये तुळस का असावी? या दिशेला ठेवा तुळस, नेहमी फायदा होईल