Vastu Tips : घरात 'हे' किटक दिसणे असते शुभ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Vastu Tips

Vastu Tips : घरात 'हे' किटक दिसणे असते शुभ

पावसाळ्यात किडे-किटक जास्त दिसू लागतात. या काळात त्यांची पैदास वाढलेली असते. अशात गोम हा शंभर पायांचा किटक ज्याला शतपद पण म्हटले जाते. जिथे दमटपणा असतो तिथे गोम अधिक आढळतात. सामान्यपणे लोक गोम ला बघून घबरतात. काही लोक गोम दिसताच तिला मारतात. पण तुम्हाला माहिती आहे का, गोम शुभ आणि अशूभ अशा दोन्ही प्रकारचे फळ देतात. ज्योतिषशास्त्रानुसार गोम राहूचे प्रतिक मानले जाते त्यामुळे याचे चांगले वाईट फळ असू शकते.

हेही वाचा: हा आहे जगातील सर्वात 'स्मार्ट किटक'; उचलू शकतो स्वतःच्या वजनापेक्षा तब्बल ५०० पट वजन; वाचाल तर व्हाल थक्क 

देवघरात गोम आढळली तर,

गोम जर देवघराजवळ आढळली तर हा शुभ संकेत मानला जातो. याचा अर्थ होतो की, लवकरच तुम्हाला काही चांगली बातमी मिळणार आहे. तर बाथरुम किंवा पायऱ्यांवर गोम आढळल्यास हा कमकुवत राहूचे लक्षण आहे.

हेही वाचा: शाब्बास... सातारकरांनी शोधला दुर्मिळ किटक

जमिनीवर जिवंत आढळल्यास,

घराच्या फरशीवर जिवंत गोम आढळल्यास हा संकेत घरासाठी अशूभ मानला जातो. यामुळे घराच्या वास्तूवर नकारात्मक प्रभाव पडतो. त्यामुळे फरशीवर गोम दिसली तर तिला बाहेर काढा.

हेही वाचा: ऑस्ट्रेलियात एक हजार पायांची गोम

मेलेली गोम आढळली तर,

घराच्या फरशीवर मेलेली गोम दिसणे शुभ मानले जाते. याचा अर्थ असतो की, घरावर याणारी मोठी आपत्ती टळली आहे.

हेही वाचा: कुठे जेवणात आढळते अळ्या तर कुठे गोम; वाचा विलगीकरणातील संतापजनक प्रकार...

गोम मारू नये

बऱ्याचदा लोक घबरून गोमला मारून टाकतात. पण तुम्हाला माहिती आहे का यामुळे तुमच्या राहू ग्रहावर परिणाम होतो. ज्यामुळे तुमच्या आयुष्यात मोठी अडचण येऊ शकते. त्यामुळे चुकूनही गोम मारू नका.

हेही वाचा: Shukra Gochar: मिथुन राशीत शुक्र ग्रह करणार गोचर, 'या' चार राशींना मोठा फटका

Web Title: Finding This Insect In The House Is Auspicious Centenary Or Gom Or Kankhajura Insect Vastu Tips

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :vastu tips