Gemini Sign : तुमची रास मिथुन आहे का? जोडीदार निवडताना अशी घ्या काळजी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Gemini Sign

Gemini Sign : तुमची रास मिथुन आहे का? जोडीदार निवडताना अशी घ्या काळजी

Gemini Sign Charactorystics : मिथुन ही राशीचक्रातील तिसरी रास आहे. स्त्री-पुरुषाचे जोडपे हे या राशीचे प्रतीक आहे. ही वायू तत्वाची 20 स्वाभावी रास आहे. बुध हा ग्रह या राशीचा स्वामी आहे. ही बुद्धी तत्त्वाची रास आहे.

मिथुन या राशीकडे निसर्गातच उत्तम ग्रहण करण्याची शक्ती असते अत्यंत चांगली बुद्धीमत्ता स्मरणशक्ती असते. यांचा जन्म जणू काही ज्ञानसाधने साठी झाला आहे. चिंतन मनन संशोधन या गोष्टींची ख्याती त्यांच्याकडे असते. यांच्याकडे वाक्यात उपयोग हसत हसत दुसऱ्यांवर टीका करणे याची सवय असते ही सर्व वैशिष्ट्ये वकिलाला लागू होतात यांचे अनेक भाषांवर प्रभुत्व असते शब्दांवर हुकूमत असते. व्याख्याने प्रवचने बौद्धिक वैचारिक चर्चासत्रे हे नेहमी गाजवत असतात.

हेही वाचा: New Year Astro Tips : एका वर्षात पडणार पैशाचा पाऊस! नवीन वर्षात करा हे उपाय

त्यामुळे विचारांची दोन टोक यांच्याकडे असतात. यांच्या जीवनात सतत विचारांचा चढउतार होत असतो या राशीमध्ये चंचलता अस्थिरपणा धरसोडपणा बोलण्यात आणि कृतीत ताळमेळ नसतो. त्यांना जर आज एक गोष्ट आवडली तर काही दिवसात त्याच गोष्टींचा त्यांना कंटाळा येतो लगेच दुसऱ्या गोष्टींकडे त्यांचा कल जातो. यांना बुद्धीवर भर देणारे खेळ आवडतात जसे काय बुद्धिबळ कॅरम पत्ते सुडोकू कोडे सोडवणे. या राशीची लोकं अनेक उद्योग करू शकतात.

हेही वाचा: Astro Tips : गुरुवारी या गोष्टी केल्याने व्हाल कंगाल, वेळीच व्हा सावध

मिथुन राशीला त्यांचा जोडीदार हा सामान्य बुद्धीचा असेल तर त्यांचा संसार चांगला रंग रूपाला येतो. यांचे व्यवसायिक भागीदारही उत्तम व्यापारी असतात. यांच्याकडे नेहमी व्यापारी सहकारी ग्राहक नातेवाईक मित्रमंडळी यांचा राफ्टा असतो. ही व्यक्ती आपल्या कुटुंबाची उत्तम व्यवस्था ठेवत असते त्यांना आपले घर सजवणे त्या त्या दोन्ही पद्धतीने ठेवणे असे आवडते. ही व्यक्ती निष्कारण बसून राहत नाही, त्यांना सतत काही ना काही करायला आवडते

हेही वाचा: Astro Tips About Saturday : सावधान! शनिवारी या गोष्टी दान करणं ठरू शकतं घातक...

हे आपल्या कुटुंबाला आनंद देण्याचा प्रयत्न करत असतात. मिथुन राशीला त्यांचा जोडीदार असा आवडतो की त्यांच्या इच्छा समजून पूर्ण करतील आणि इतरांकडे लक्ष देणार नाहीत. जर त्यांना जाणवली की आपला जोडीदार आपल्या अधिकार वाजवतो तर ते घरापासून लांब राहतात कारण त्यांना दबाव सहन होत नाही. मिथुन राशी, तूळ, कुंभ, मेष, सिंह राशीचे जोडीदार चालतात.

मिथुन राशीचे व्यक्ती या साधारणतः बँकिंग, पोस्ट ऑफिस, वकील, बातमीदार, विमा योजना, जनसंपर्क प्रसिद्ध, कम्प्युटर रायटिंग सेक्टर, विज्ञान शाखा, स्टेटस कायदा या क्षेत्रात आढळतात याच्यावर त्यांचा उत्तम प्रभाव असतो. वेगवेगळ्या कंपन्या त्यांच्या फॉर्मस यांची आखणी जुळणी प्रोजेक्ट रिपोर्ट करू शकतात.

त्यांच्याकडे अनेक गोष्टींचा खजिना असतो ज्ञानाचे भंडार असते. ग्रंथ लेखन लेखक याही क्षेत्रात सापडतात. कविता करणे समीक्षा करणे यात सुद्धा यांचा हातभार असतो. या व्यक्ती वृत्तपत्र आकाशवाणी टेलिव्हिजन यासारख्या प्रसारमाध्यमांवर आघाडीत असतात शब्दांचा अचूक प्रयोग व त्यांचा अस्त्र असतो त्यांच्या बोलण्याच्या पद्धतीमुळे त्यांना असाधारणपणे लोकप्रियता लाभते.

जर ही रास बिघडली तर मिथुन राशीचे लोक निर्णय लवकर होत नाही आळस करणे घर कसे बांधावे फर्निचर कसे करावे शिक्षणात कोणती शाखा निवडावी याचा संभ्रम निर्माण होऊन वेगळेच वळण यांच्या आयुष्याला लागते. योग्य निर्णय न घेतल्यामुळे त्यांचे अतोनात नुकसान होत असते.

या राशींना होणाऱ्या आजार म्हणजे खोकला दमा व श्वसनलिकाचा दाह, छातीचे आजार हे आहेत.