

Gold Vastu Tips:
Sakal
Gold vastu tips according to astrology: भारतीय परंपरेत सोनं केवळ एक महागडा धातू मानला जात नाही तर तो संपत्ती, शुद्धता आणि शुभतेचे प्रतीक देखील आहे. लग्न, पूजा आणि इतर धार्मिक विधींमध्ये सोन्याला खुप महत्त्व आहे. ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येत धातूची स्वतःची ऊर्जा आणि ग्रहांची भूमिका असते. ज्याप्रमाणे प्रत्येक रत्न प्रत्येक व्यक्तीसाठी योग्य नसते, त्याचप्रमाणे सोनं सर्व राशींना समान परिणाम देत नाही. असं मानलं जातं की जर सोनं एखाद्या व्यक्तीच्या राशी किंवा कुंडलीशी सुसंगत नसेल तर त्याचा जीवनावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. यामुळे आर्थिक नुकसान आणि मानसिक समस्या निर्माण होऊ शकतात. यामुळे कोणत्या राशींसाठी सोनं शुभ आहे हे जाणून घेऊया.