Gudi Padwa 2024 : आज गुढी पाडवा, आजच्या दिवशी कोणाला चुकूनही देऊ नका घरातील या 4 वस्तू

नवीन वर्षात तुम्हाला सुख समाधानाने जगता यावे यासाठी काही गोष्टींची आवर्जून खबरदारी घ्यावी
Gudi Padwa 2024
Gudi Padwa 2024 esakal

Gudi Padwa 2024 : आज गुढी पाडवा. हिंदू धर्मातील नव्या वर्षाला आजपासून गुढी पाडव्याच्या मुहूर्ताला सुरुवात होते. तेव्हा नवीन वर्षात तुम्हाला सुख समाधानाने जगता यावे यासाठी काही गोष्टींची आवर्जून खबरदारी घ्यावी.

गुढी पाडव्यानंतर सुरु होणाऱ्या नवीन वर्षात घरातील काही गोष्टी अजिबात कोणालाही द्यायच्या नसतात. या वस्तूंसोबत आपलं भाग्य जोडलेलं असतं. तेव्हा या गोष्टी इतरांना देऊन तुम्ही तुमचं भाग्य त्यांना देत असता. असे केल्याने तुमच्या घरात ताणतणाव वाढेल. घरात क्लेश निर्माण होईल. तेव्हा या गोष्टी कोणत्या ते आपण जाणून घेऊया. (tradition)

नव्या वर्षाला घरी मिठाई आणा. त्याचा प्रसाद देवापुढे ठेवा. नंतर घरातील सगळ्या सदस्यांना हा प्रसाद वाटा. असे केल्याने वर्षभर तुमच्या कुटुंबात सुखसमृद्धी राहील. गुढी पाडव्याच्या दिवशी चुकूनही काळ्या रंगाचे कपडे घालू नये. काळ्या रंगाऐवजी लाल किंवा पिवळ्या रंगाचे कपडे घालावे. या दिवशी घरात लख्ख प्रकाश असावा. तसेच पाकिटात नव्या, कोऱ्या करकरीत नोटा नक्की ठेवा.

Gudi Padwa 2024
Gudi Padwa 2023 : वर्षभर टेन्शन फ्री आणि आनंदी रहायचा जाणून घ्या मंत्र, गुढीपाडव्याला हे नक्की करा

या गोष्टी चुकूनही कोणाला देऊ नका

दही

नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी कोणालाही दही देऊ नये. ती व्यक्ती कितीही जवळची असली तरी त्याला दही देऊ नका.

मीठ

मीठ ही अशी वस्तू आहे जी उसनी कधीही कोणाला देऊ नये.

तांदूळ

वेगवेगळे उपाय तोटके करताना तांदूळ वापरले जातात. खूप प्रयत्न करूनही खरात पैसा टिकत नसेल तर तांदूळही कोणाला देऊ नका.

१ रुपयांचा सिक्का

तुम्हीही केलेल्या कमाईतील एक रुपयाचा सिक्का कोणालाही देऊ नका.

Gudi Padwa 2024
Gudi Padwa 2023 : गुढी पाडव्याआधी आजच घरात करा हे बदल, घरात नांदेल सुखसमृद्धी अन् पैशांची भरभराट...

घरात तुटक्या फुटक्या वस्तू असतील तर त्या बाहेर काढा. त्याने नकारात्मक उर्जा (Negative Effect) घरात वास करते. तुमच्या घरातील तिजोरी, कपाट, ड्रॉवर उघडे ठेवू नका. वर्षाच्या पहिल्या दिवशी घरातील जी लक्ष्मी आहे ती कपटातच ठेवा. कपाट सतत उघडे ठेवू नका.

डिस्क्लेमर - वरील लेख सामान्य माहितीवर आधारलेला असून सकाळ समुह यास पाठिंबा देत नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com