

ChaturGrahi Yog 7 December 2025 Horoscope prediction
esakal
Astrology News : ज्योतिषशास्त्रावर विश्वास असणाऱ्यांसाठी रविवार, ७ डिसेंबर हा दिवस खास आहे. पौष महिन्यातील कृष्ण पक्षाची तृतीया, पुनर्वसु नक्षत्र आणि सूर्यदेवाच्या कृपेने आकाशात एक दुर्मिळ चतुर्ग्रही योग जुळून येत आहे. शुक्र, बुध, सूर्य आणि मंगळ हे चार ग्रह एकत्र येऊन लक्ष्मी योग, वसुमान योग, गजकेसरी योग आणि शुक्ल योग असे अनेक शुभ संयोग निर्माण करणार आहेत. चंद्र मिथुन ते कर्क राशीत संक्रमण करेल, तर मंगळ वृश्चिक ते धनु राशीत प्रवेश करेल. या सर्व योगांमुळे या पाच राशींना पैसा, सुख, मान-सन्मान आणि कौटुंबिक आनंदाचा खूप मोठा लाभ होणार आहे.