Makar Sankranti : यंदाची संक्रात जीवनावश्यक वस्तूंवर, 'या' राशींना होणार मानसिक, आर्थिक त्रास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Makar Sankranti 2023

Makar Sankranti : यंदाची संक्रात जीवनावश्यक वस्तूंवर, 'या' राशींना होणार मानसिक, आर्थिक त्रास

सौ. कानन माधव काकरे

( ज्योतिष तज्ज्ञ आणि टॅरोट कार्ड रीडर)

Makar Sankranti 2023 : नवीन वर्षातील येणारा पहिला सण म्हणजे संक्रांत "तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला" असे म्हणत आपण हा सण साजरा करतो. पण संक्रांत म्हटलं की प्रत्येकाच्या मनात थोडीशी काम होईना भीती असते. याकाळात सूर्य मकरराशीत प्रवेश करतो. हा काळ जसा वातावरणात अनंक बदल घडण्याचा असतो, तसाच ग्रहस्थिती बदलण्याचा म्हणजे संक्रमणाचा काळ असतो. म्हणून याला संक्रांत म्हणतात.

यंदा आपण संक्रांति मुळे कोणत्या राशीवर परिणाम होणार आहेत हे पाहणार आहोत. रवी धनु राशीतून मकर राशीत येणार आहे मकर राशीत अगोदरच शनी आणि शुक्र विराजमान आहेत. 17 जानेवारीला शनि महाराज कुंभ राशीत प्रवेश करणार आहेत आणि 22 जानेवारीला शुक्र पण कुंभ राशीत जाणार आहेत.

हेही वाचा: Makar Sankranti 2023 : नात्यातील ‘गोडवा’ यंदाच्या वर्षी झाला महाग

तरुण तरुणींना होणार त्रास

यंदाची संक्रांत कुमारी अवस्थेत आहे. त्यामुळे तरुण-तरुणींना त्रास संभवतो. उदाहरणार्थ शिक्षण अभ्यास बाबतीत किंवा करिअरच्या बाबतीत किंवा नोकरीच्या बाबतीत, प्रेम प्रकरण, लग्न, लिव्ह इन रिलेशनशिप याबाबतीत अपेक्षाभंग होऊ शकतो.

हेही वाचा: Makar Sankranti Fashion : हळदी कुंकवात तुम्हीच दिसाल उठून, ट्राय करा लेटेस्ट फॅशन

जीवनावश्यक वस्तू महागणार

 • सुवासिक वस्तू महाग होण्याची शक्यता आहे. उदाहरणार्थ : साबण परफ्युम सुवासिक तेल

 • उद्योजक मंडळी आणि पुढारी यांच्या मिलीभगती मुळे जनतेला ही त्रास होईल. महागाई आणखी थोडी वाढण्याची शक्यता आहे.

 • उदाहरणार्थ तेल, डाळी, हळद इत्यादींवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा: Makar Sankranti Festival: सावधान : पतंगीचा मांजा बेतू शकतो जीवावर!

राजकीय क्षेत्रात उलथापालथ

 • केंद्र सरकारकडून राज्य सरकारवर आणि पर्यायाने जनतेवर बराचसा दबाव येणार आहे. राजकीय क्षेत्रात बरीच उलथा पालथ दिसून येईल.

 • स्वतःच्या स्वार्थासाठी आरोप प्रत्यारोप होतील.

 • प्रत्येक जण आपल्या पोळीवर तूप लाटून घेण्याचा प्रयत्न करेल.

 • यातून जनतेची दिशाभूल होणार आहे.

 • धार्मिक गोष्टी जातीयवाद यावरही परिणाम दिसून येईल.

 • आरक्षण मोर्चे उपोषण अशा काही गोष्टी घडतील.

या राशींना होणार त्रास

 • कर्क,सिंह, वृश्चिक आणि धनु या राशींना शारीरिक मानसिक आणि आर्थिक त्रास संभवतो.

 • आर्थिक टंचाई जाणवण्याची शक्यता आहे.

यावर उपाय

रोज सकाळी अंघोळ झाल्यावर सूर्याला अर्ध्य देणे.

||ॐ सू सूर्याय नमः|| आणि || ॐ गं गणपतये नमः|| या मंत्रांचा जप रोज 21 वेळा करणे