

Mangal Gochar 2026
Sakal
Mars Saturn transit career impact: सेनापती मंगळ मकर राशीत स्थित आहे. तो लवकरच कुंभ राशीत गोचर करेल, जो ज्योतिषशास्त्रातील प्रमुख संक्रमणांपैकी एक मानला जातो. मंगळाला ऊर्जा, धैर्य, शौर्य आणि युद्धाचा कारक मानलं जातं. त्याचा शुभ प्रभाव व्यक्तीला धैर्यवान आणि निर्भय बनवतो.
दुसरीकडे, शनि न्यायाचे प्रतीक आहे, जो एखाद्याच्या कृतींवर आधारित परिणाम देतो. मंगळ आणि शनि मैत्रीपूर्ण नसल्यामुळे, कुंभ राशीत त्यांचे आगमन १२ राशींच्या लोकांपैकी काही राशाच्या लोकांसाठी समस्या वाढवू शकते. नकारात्मक प्रभाव, करिअरमधील अडथळे, गुंतवणुकीचा ताण आणि इतर समस्या देखील उद्भवू शकतात. तर, मंगळ कुंभ राशीत कधी गोचर करेल आणि कोणत्या राशींच्या लोकांनी काळजी घेणे गरजेचे आहे हे जाणून घेऊया.