Prabodhini Ekadashi : त्रिदेवात स्थान असलेल्या भगवान विष्णूंना का मिळाला शाप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Prabodhini Ekadashi

Prabodhini Ekadashi : त्रिदेवात स्थान असलेल्या भगवान विष्णूंना का मिळाला शाप

Prabodhini Ekadashi : हिंदू धर्मानुसार, भगवान विष्णू आषाढ शुक्ल एकादशीपासून कार्तिक शुक्ल एकादशी पर्यंत चार महिन्यांसाठी झोपतात. याच काळाला आपण चातुर्मास म्हणतो आणि याकाळात कोणतेही लग्न करण्याला मनाई असते; देवउठणी एकादशीच्या दिवशी चातुर्मास संपतो आणि लग्नकार्य सुरू होतात.देवउठणी किंवा प्रबोधिनी एकादशीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशीच्या दिवशी शालिग्राम आणि तुळशीचा विवाह केला जातो.

हेही वाचा: Prabodhini Ekadashi 2022: प्रबोधिनी एकादशीची नेमकी कथा काय आहे?

देवउठणी एकादशी कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला साजरी केली जाते. तिला प्रबोधिनी एकादशी असेही म्हणतात. या वर्षी देवउठणी एकादशी 4 नोव्हेंबर 2022 रोजी शुक्रवारी आहे. 5 नोव्हेंबर 2022 रोजी एकादशीचा उपवास सोडून आणि त्याच दिवशी तुळशीविवाहही केला जातो.

हेही वाचा: Kartiki Ekadashi 2022 : कार्तिक एकादशीला देवउठणी एकादशी का म्हणतात? जाणून घ्या

का दिलेला भगवान विष्णूंना शाप

हिंदू धर्मग्रंथानुसार वृंदा नावाची एक मुलगी होती. समुद्रमंथनातून जन्मलेल्या जालंधर नावाच्या राक्षसाशी वृंदाचा विवाह झाला. वृंदा ही भगवान विष्णूंची खूप मोठी भक्त असलेली एक सद्गुणी स्त्री होती, तिच्या या गुणांमुळे तिचा पती जालंधर अधिक शक्तिशाली झाला आणि राक्षसी वृत्तीने इतरांना त्रास देऊ लागला.

हेही वाचा: Kartik Ekadashi 2022 : कार्तिक एकादशी पूजा कशी करावी? जाणून घ्या कोणत्या मंत्राचा करावा जप

देवांचा देव महादेवही जालंधरला पराभूत करू शकला नाही. भगवान शिवासह देवांनी जालंधराचा नाश करण्यासाठी भगवान विष्णूची प्रार्थना केली. भगवान विष्णूंनी जालंधरचा वेश धारण करून वृंदा या सद्गुणी स्त्रीची पवित्रता नष्ट केली.

हेही वाचा: Kartiki Ekadashi : अमृता वहिनींनी घातली फुगडी तर फडणवीसही टाळाच्या तालावर थिरकले!

वृंदाची पवित्रता संपल्यावर जालंधरची शक्ती संपली आणि भगवान शिवाने जालंधरचा वध केला. जेव्हा वृंदाला भगवान विष्णूच्या भ्रमाबद्दल कळले तेव्हा तिने क्रोधित होऊन भगवान विष्णूला काळा दगड (शालिग्राम दगड) होण्याचा शाप दिला.

हेही वाचा: Kartiki Ekadashi : शेतकऱ्यांचं, कष्टकऱ्यांचं जीवन सुजलाम सुफलाम व्हावं; फडणवीसांचं विठुरायाला साकडं

भगवान विष्णूंना दगडाचे बनलेले पाहून सर्व देवी-देवतांमध्ये एकच आक्रोश झाला, मग माता लक्ष्मींनी वृंदाची प्रार्थना केली, तेव्हा वृंदाने जगाच्या कल्याणासाठी आपला शाप मागे घेतला आणि जालंधरसह स्वतःही सती झाली.

हेही वाचा: Pashankusha Ekadashi 2022 : आज आहे सर्व इच्छा पूर्ण करणारे पाशांकुशा एकादशी व्रत

तेव्हा त्या राखेतून एक रोप बाहेर आले, ज्याला भगवान विष्णूंनी तुळशीचे नाव दिले आणि दगडात स्वतःचे रूप समाविष्ठ करताना सांगितले की आजपासून मी तुळशीशिवाय नैवेद्य स्वीकारणार नाही. या दगडाची तुळशीजींसोबत शाळीग्राम नावाने पूजा केली जाईल. तुलसीजींचा विवाहही कार्तिक महिन्यात शालिग्रामसोबत होतो.