Raksha Bandhan 2023: 31 ऑगस्टचाही रक्षाबंधनाचा मुहूर्त हुकलाय का? कधी बांधावी राखी, जाणून घ्या सविस्तर

३१ ऑगस्टचाही रक्षाबंधन सणाचा मुहूर्त हुकलाय का? मग आता सण कसा साजरा करावा? याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेऊया.
Raksha Bandhan 2023
Raksha Bandhan 2023Sakal

Raksha Bandhan 2023 : राखी पौर्णिमेचा सण यंदा भद्र काळाच्या सावटामुळे ३० ऑगस्ट आणि ३१ ऑगस्ट या दोन दिवस साजरा करण्यात आला. पण काही कारणास्तव बहुतांश जणांना या दोन्ही दिवशीही हा सण साजरा करणं जमलंच नसल्याचे ऐकण्यास मिळत आहे.

मग आता रक्षाबंधन सण साजरा करावा की करू नये, याबाबत तुमचा गोंधळ उडाला आहे. पण चिंता करू नका. कारण ३१ ऑगस्टला ठराविक कालावधीदरम्यान तुम्ही भावाच्या मनगटावर राखी बांधू शकता. 

Raksha Bandhan 2023
Raksha Bandhan 2023: कोणी डॉक्टर तर कोणी आर्मीत! बॉलिवूड स्टार्सची ही भावंडं कॅमेऱ्यापासून लाबंच!

श्रावणी पौर्णिमा 

३१ ऑगस्टला श्रावणी पौर्णिमा देखील साजरी केली जाणार आहे. त्यामुळे ३१ ऑगस्टलाही आपण रक्षाबंधन सण साजरा करू शकता. या दिवशी भक्तगण उपवासही करतात, तशी परंपरा आहे. महत्त्वाचे म्हणजे आज दुपारी राहू काळ देखील सुरू होणार आहे. दुपारी १ वाजेदरम्यान ते दुपारी ३.३३ वाजेपर्यंत राहू काळ असणार आहे. त्यामुळे या काळात भावाला राखी बांधणे टाळावे.   

Raksha Bandhan 2023
Raksha Bandhan 2023: "अपना टाईम आ गया" एकेकाळी एक रुपया ताटात टाकणाऱ्या शिवनं बहिणीला रक्षाबंधनला दिलं 'हे' महागडं गिफ्ट

कसे करावे औक्षण?

कोणत्याही महत्त्वाच्या कार्यासाठी औक्षण करणे शुभ मानले जाते. राखी बांधण्यापूर्वीही भावाचे औक्षण करण्याची परंपरा आहे. त्यामुळे औक्षणाच्या थाळीमध्ये चंदन, अक्षता, हळद-कुंकू, नारळ, दिवा, मिठाई या सर्व गोष्टी ठेवाव्यात. 

Raksha Bandhan 2023
Raksha Bandhan 2023 : राखी पौर्णिमेवर संक्रांत आणणारा भद्राकाळ आहे तरी काय? लोक त्याला एवढे का घाबरतात?
  • सर्व प्रथम भावाच्या कपाळावर टिळा लावावा.

  • यानंतर भावाची आरती ओवाळावी. 

  • आरतीनंतर भावाला राखी बांधून मिठाई भरवावी आणि त्यांच्या उदंड जीवनासाठी देवाकडे प्रार्थना करावी.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com