राखी के बंधन को निभाना! हात गमावणाऱ्या तरुणाला मृत व्यक्तीमुळे मिळाले जीवदान व बहिणीसह नवे कुटुंब

रक्षाबंधन सणानिमित्त मनाला स्पर्श एक भावूक कहाणी समोर आली आहे. राजस्थान आणि गुजरात राज्यात आगळ्यावेगळ्या पद्धतीने भाऊबहिणीच्या नात्याचा हा सण साजरा करण्यात आल्याचे पाहायला मिळाले.
Raksha Bandhan Special Story
Raksha Bandhan Special StorySakal

Raksha Bandhan 2023 : राजस्थान राज्यातील श्रीगंगानगर भागातील रहिवासी असणारा २३ वर्षीय तरुण जगदेव सिंहने एका दुर्घटनेमध्ये आपले दोन्ही हात गमावले. ‘The Times of India’ने दिलेल्या माहितीनुसार, जगदेवचे भावोजी निर्मल ढिल्लो यांनी सांगितलं की, ‘वर्ष २०१९ मध्ये जगदेव शेतीच्या ट्युबवेलचे काम करत होता. रविवारचा दिवस होता. 

याचदरम्यान मशीनच्या मोटरमध्ये बिघाड निर्माण झाला. त्यावेळेस आसपास मदतीसाठी कोणीही हजर नव्हते. म्हणून त्याने स्वतःच बिघाड दुरुस्त करण्याचा निर्णय घेतला. यादरम्यान मोटर व इलेक्ट्रिक वायर जोडण्याचा प्रयत्न करत असतानाच त्याला जोरदार विजेचा धक्का बसला. या दुर्घटनेत त्याचे दोन्ही हात व पाय वाईटरित्या भाजले’.

Raksha Bandhan Special Story
Raksha Bandhan 2023 : भावा-बहिणीच्या नात्यावरची साडेसाती ठरतंय हक्कसोड पत्र? वाचा काय आहे?

तरुणाला मिळाले हात आणि बहीण 

जगदेव सिंह मृत्यूशी कडवी झूंज देत होता. त्याचा जीव वाचण्यासाठी जवळपास दोन आठवड्यानंतर त्याचे दोन्ही हात व पाय कापण्याचा निर्णय कुटुंबीयांकडून घेण्यात आला. घराची जबाबदारी पेलणाऱ्या व्यक्तीवरच हात गमावण्याची वेळ आल्याने सिंह कुटुंबीय दुःखात बुडाले होते.

Raksha Bandhan Special Story
Raksha Bandhan 2023 : राखी पौर्णिमेवर संक्रांत आणणारा भद्राकाळ आहे तरी काय? लोक त्याला एवढे का घाबरतात?

पण याचदरम्यान अहमदाबादच्या सिव्हिल हॉस्पिटलमधील एका ब्रेन डेड व्यक्तीच्या कुटुंबाने जगदेवला हात दान करण्याचा निर्णय घेतला. या घटनेमुळे सिंह कुटुंबीयांना दिलासा मिळाला. 

बहिणीसह मिळाले नवे कुटुंब

निर्मल ढिल्लो यांनी सांगितले की, आम्हाला आमच्या मुलासह आणखी एक नवे कुटुंब देखील मिळाले. या घटनेनंतर मृत पावलेल्या व्यक्तीची बहीण आता जगदेवलाच आपला भाऊ मानते.  

Raksha Bandhan Special Story
Raksha Bandhan 2023 : रक्षाबंधनादिवशी होणार दुर्लभ योग; या चूका करणं महागात पडेल!

दोन वर्षांपासून असा साजरा होतोय रक्षाबंधनाचा सण

गेल्या दोन वर्षांपासून जगदेवची ही बहीण त्याला गुजरातमधील अहमदाबाद येथून राखी पाठवते. नशिबामुळे या दोघांमध्ये भाऊ-बहिणीचे नाते निर्माण झाले. दरम्यान जगदेवला काही दिवस आपल्या हातांची काळजी घ्यावी लागणार आहे. पण नवीन हात आणि कृत्रिम पाय मिळाल्याने जीवन जगण्याची दुसऱ्यांदा संधी मिळाल्याचीही भावना त्याने व्यक्त केलीय.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com