Raksha Bandhan 2023 : भाऊ आपल्या मनगटावरून कधी काढू शकतो राखी? जाणून घ्या शास्त्र

Raksha Bandhan 2023 दरवर्षी श्रावण महिन्यात पौर्णिमेला रक्षाबंधन हा बहीणभावाच्या नात्याचा सण साजरा केला जातो. शास्त्रात राखी बांधण्यासोबतच ती काढण्यासाठी काही नियमही आहेत. जाणून घेऊया याबद्दल सविस्तर माहिती…
Raksha Bandhan 2023
Raksha Bandhan 2023Sakal
Updated on

Raksha Bandhan 2023 : रक्षाबंधनाचा सण भाऊ-बहिणीच्या नात्याचे पावित्र्य दर्शवतो. या दिवशी बहिणी आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधतात आणि त्याला दीर्घायुष्य मिळावे, यासाठी प्रार्थना करते. तर भाऊ देखील आपल्या बहिणीला तिचे आयुष्यभर रक्षण करण्याचे वचन देतो. दरम्यान यंदाच्या रक्षाबंधनाच्या दिवशी पंचक व भद्रा काळ आहे. यादरम्यान रक्षाबंधन साजरा करू नये, कारण अशुभ मानले जाते.   

Raksha Bandhan 2023
Raksha Bandhan 2023 : रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणींना देऊ नका हे गिफ्ट, जाणून घ्या कारण

भाऊ कधी काढू शकतो राखी?

शास्त्रात राखी काढण्यासाठी कोणताही निश्चित दिवस किंवा निश्चित अशी वेळ सांगितलेली नाही. रक्षाबंधनाच्या 24 तासांनंतर तुम्ही हातावरून राखी काढू शकता. तसेच राखी संपूर्ण मनगटावर बांधू नये. असे केल्यास दोष लागू शकतो.

Raksha Bandhan 2023
Sawan Purnima 2023 : श्रावण पौर्णिमा नेमकी कधी आहे 30 की 31 ऑगस्ट? जाणून घ्या कोणत्या दिवशी करावा उपवास

राखी पौर्णिमेनंतर काही दिवसांनी पितृपक्ष सुरू होत आहे, त्यामुळे अशा स्थितीत आपण मनगटावर राखी ठेवू नये, असे तज्ज्ञमंडळींचे म्हणणे आहे. म्हणून रक्षाबंधनाच्या 24 तासांच्या आत हातावरील राखी काढावी. अन्यथा नकारात्मकता निर्माण होऊ शकतात.

Raksha Bandhan 2023
Raksha Bandhan Gift Ideas : यंदाचं रक्षाबंधन बनवा खास, बहिणीला गिफ्ट करता येतील अशा झकास आयडिया!

राखीचे कसे करावे विसर्जन?

मनगटावरील राखी काढल्यानंतर ती इकडे-तिकडे कुठेही न ठेवता, तिचे व्यवस्थित विसर्जन करावे. विसर्जन म्हणजे आपण ही राखी एखाद्या झाडावरही बांधू शकता.

राखीचा दोरा तुटला असेल तर काय करावे?

राखीचा दोरा तुटला असेल तर ती राखी जपून ठेवू नये. अशी राखी एखाद्या झाडाखाली ठेवावी किंवा तिचे वाहत्या पाण्यात विसर्जन करावे. असे करताना त्यासोबत एक रूपयाचे नाणे देखील ठेवावे. 

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com