Rudraksha Tips : आपल्या राशीनुसार घाला रुद्राक्ष; कधीही भासणार नाही धनाची कमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rudraksha Tips

Rudraksha Tips : आपल्या राशीनुसार घाला रुद्राक्ष; कधीही भासणार नाही धनाची कमी

Rudraksha Tips : हिंदू धर्मात रुद्राक्षाला खूप महत्त्व आहे. कधी निरीक्षण केलं तर तुमच्या लक्षात येईल की बरेच देव देवी रुद्राक्ष घालतात. एकूण 14 मुखी रुद्राक्ष आहेत, याशिवाय गौरी शंकर आणि गणपती रुद्राक्षही आहे. रुद्राक्ष अकाली मृत्यू आणि शत्रूच्या त्रासापासून रक्षण करतो.

हेही वाचा: Rudraksha Importance : रुद्राक्ष धारण केल्याने बदलते आयुष्य; जाणून घ्या महत्त्व

जगात खूप लोक रुद्राक्ष वापरतात. रुद्राक्षाचा वापर मंत्रोच्चारात सुद्धा केला जातो. खरतर, रुद्राक्ष हा एका आयुर्वेदिक आणि आध्यात्मिक महत्त्व असलेल्या झाडाच्या फळाची बी आहे. पौराणिक कथांनुसार रुद्राक्षाचा जन्म भगवान शंकराच्या अश्रूतून झाला होता.

हेही वाचा: Cucumber Thalipeeth Recipe : बनवा खूशखुशीत,खमंग अन् हेल्दी काकडीचे थालीपीठ

रुद्राक्ष धारण करण्यासाठीची काळजी

रुद्राक्ष लाल किंवा पिवळ्या धाग्यात धारण करावा. पौर्णिमेच्या दिवशी, अमावास्येला किंवा सोमवारी तो घालणे उत्तम मानले जाते. रुद्राक्ष एक, सत्तावीस, चौपन्न किंवा एकशे आठ या संख्येत धारण करावा. हे परिधान केल्यानंतर मांसाहारी जेवण आणि अल्कोहोलचे सेवन करू नका. धातूसह रुद्राक्ष धारण करणे अधिक चांगले आहे. रुद्राक्ष सोन्या-चांदीसोबत किंवा तांब्यासोबत धारण करता येतो. दुसऱ्या व्यक्तीने घातलेली रुद्राक्षाची जपमाळ घालू नका. झोपताना रुद्राक्ष घालून झोपू नका.

हेही वाचा: Garlic Bread Sticks Recipe : काहीतरी मजेशीर खावस वाटत आहे? मग ट्राय करा, गार्लिक ब्रेड स्टिक्स

रुद्राक्षाचे लाभदायक फायदे

1. लग्न लवकर व्हावे अस वाटत असेल तर दोन मुखी रुद्राक्ष किंवा गौरी शंकर रुद्राक्ष वापरा.

2. विद्यार्थ्यांनी एकाग्रतेसाठी पाच मुखी रुद्राक्ष धारण करावा.

3. आरोग्य आणि दीर्घायुष्यासाठी एक मुखी किंवा 11 मुखी रुद्राक्ष वापरा.

4. नोकरीत येणारे अडथळे टाळण्यासाठी तीन मुखी रुद्राक्ष वापरा.

5. वाईट सवयीपासून मुक्त होण्यासाठी पंचमुखी रुद्राक्ष धारण करा.

6. देवाच्या उपासनेसाठी 11 मुखी रुद्राक्ष धारण करावेत.

हेही वाचा: Poli Ladu Recipe : शिळ्या पोळ्या उरल्या आहेत? मग बनवा खास गुळाचा लाडोबा

रुद्राक्ष घासून त्याचा टीका लावल्याने तेज आणि सौंदर्य वाढते. त्याची पेस्ट तळवे आणि कपाळावर लावल्याने मानसिक शांती मिळते. शिक्षणात अडथळा येत नाही. रुद्राक्ष धारण केल्याने तणाव दूर राहतो.

हेही वाचा: Winter Health Care: हिवाळ्यात चुकूनही सॉक्स घालून झोपू नका; होऊ शकतो हा त्रास...

राशीनुसार रुद्राक्ष धारण करा

- मेष आणि वृश्चिक राशीच्या लोकांसाठी तीन मुखी रुद्राक्ष उत्तम आहे. हा रुद्राक्ष अग्नि आणि तेजाचे रूप आहे.

- वृषभ आणि तूळ राशीच्या लोकांसाठी सहा मुखी रुद्राक्ष उत्तम आहे. हे भगवान कार्तिकेयाचे रूप मानले जाते.

- मिथुन आणि कन्या राशीसाठी चार मुखी रुद्राक्ष उत्तम मानले जातात. हे ब्रह्मदेवाचे रूप मानले जाते.