Shani Jayanti 2022: शनिदेव अन् भगवान हनुमानाचं झालं होतं युद्ध; जाणून घ्या कारण

शनिदेवाला मोहरीचं तेल अर्पण करतात, याचं कारण आपल्याला पौराणिक कथांमध्ये सापडतं.
Shanidev and Bhagvanji Hanuman
Shanidev and Bhagvanji Hanuman Sakal

Shani Jayanti 2022: वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार नवग्रहात शनिदेवाचे विशेष स्थान आहे. शनिदेव हे कर्मफल देणारे आहेत असे म्हणतात. म्हणजे शनिदेव माणसाला त्याच्या कर्मानुसार फळ देतात. जर एखाद्या व्यक्तीने चांगले कर्म केले तर त्याचे शुभ फळ प्राप्त होते. दुसरीकडे, जर एखाद्या व्यक्तीने वाईट कर्म केले तर ते त्या व्यक्तीला वाईट फळ देतात.

भक्त आपापल्या परीने शनिदेवाला प्रसन्न करण्याचा प्रयत्न करतात आणि शनिदेवाला मोहरीचे तेलही अर्पण करतात. पण तुम्हाला माहित आहे का आपण शनिदेवाला मोहरीचे तेल का अर्पण करतो. याचे कारण काय? आज आम्ही तुम्हाला शनिदेवाला मोहरीचे तेल अर्पण करण्याचे कारण काय आहे हे सांगणार आहोत. चला जाणून घेऊया.

Shanidev and Bhagvanji Hanuman
Shani Jayanti 2022: साडेसातीपासून वाचण्यासाठी अवश्य करा हे उपाय; त्रासांपासून मिळेल मुक्ती

भगवान हनुमानासोबत शनिदेवाचे झाले युद्ध-

धर्मग्रंथानुसार, एकदा शनिदेवाला आपल्या शक्ती आणि सामर्थ्याचा गर्व झाला होता. त्याचवेळी भगवान हनुमानाची सामर्थ्याची किर्ती आणि पराक्रमाची सगळीकडे चर्चा होत होती. बजरंगबलीच्या शक्तीची आणि सामर्थ्याची सर्वजण स्तुती करायचे. जेव्हा शनिदेवांना (Shanidev) हे कळले तेव्हा त्यांना भगवान हनुमानाच्या (Hanuman) शक्तीची स्तुती सहन झाली नाही, आणि शनिदेवांनी हनुमानजींना युद्धासाठी आव्हान दिले. जेव्हा शनिदेव युद्धासाठी हनुमानजींकडे गेले, तेव्हा हनुमानजी रामाच्या भक्तीत लीन झाले होते. जेव्हा शनिदेवाने हनुमानजींना युद्ध करण्यास सांगितले तेव्हा हनुमानजी त्यांना समजवायचा प्रयत्न करू लागले. परंतु शनिदेवाने त्यांचं ऐकले नाही आणि युद्धा करण्यावर ठार झाले. त्यानंतर दोघांमध्ये घनघोर युद्ध झाले. यादरम्यान हनुमानजींनी शनिदेवांना पराजित केलं.

असे म्हणतात की युद्धात शनिदेव गंभीर जखमी झाले होते आणि त्यांना भयंकर वेदना होऊ लागल्या होत्या. त्यांच्या वेदना पाहून भगवान हनुमानाने शनिदेवाला मोहरीचे तेल लावले, त्यामुळे त्यांना वेदनांपासून आराम मिळाला आणि शनिदेवाची संपूर्ण वेदना काही वेळात नाहीशी झाली. यानंतर शनिदेव म्हणाले की, जो खऱ्या मनाने मला तेल लावेल, त्याचे सर्व संकट दूर होतील. तेव्हापासून शनिवारी शनिदेवाला तेल अर्पण करण्याची परंपरा सुरू झाली.

Shanidev and Bhagvanji Hanuman
Shani Jayanti 2022: शनि जयंतीदिवशी राशीनुसार करा 'या' मंत्रांचा जप, संकटांपासून मिळेल मुक्ती

हनुमानजींनी शनिदेवाला केले मुक्त-

दुसर्‍या एका कथेनुसार, एकेकाळी रावणाने सर्व नवग्रहांना आपल्या दरबारात बंदी करून घेतले होते. ज्यामध्ये रावणाने शनिदेवाला उलटे टांगले होते. तेव्हाच जेव्हा बजरंगबली सीतामातेच्या शोधात लंकेत पोहोचले तेव्हा रावण संतापला आणि त्याने सैनिकांना हनुमानजींच्या शेपटीला आग लावायला सांगितली आणि हनुमानजींच्या शेपटीला आग लागल्यावर लंकेलाही आग लागली आणि मग तिथे बंदी असलेले सर्व ग्रह पळून गेले. परंतु उलटे लटकल्याने शनिदेव पळू शकले नाहीत.

शनिदेवाच्या अंगात खूप वेदना होत होत्या. त्याच्या वेदना खूप होत्या. शनिदेवाच्या वेदना कमी करण्यासाठी हनुमानजींनी त्यांच्या अंगाला तेल लावले. त्यानंतर शनिदेवाची वेदना नाहीशी झाली. त्यानंतर शनिदेव म्हणाले की जो कोणी माझ्यावर श्रद्धेने तेल अर्पण करेल त्याच्या सर्व समस्या दूर होतील. त्यामुळे शनिदेवावर मोहरीचे तेल लावले जाते. तसेच शनिदेव म्हणाले की, जो कोणी शनिवारी हनुमानजीची पूजा करेल. मी त्याच्यावर कधीही वाईट नजर ठेवणार नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com