Shani Rashi Gochar 2023 : शनिचं राशीपरिवर्तन; मीन राशीच्या लोकांवर असा पडेल प्रभाव

शनि राशीच्या परिवर्तनाने मीन राशी असलेल्या लोकांच्या व्यवसाय, करियर आणि आर्थिक स्थितीवर काय परिणाम होऊ शकतो ते आपण जाणून घेऊया
Shani Rashi Gochar 2023
Shani Rashi Gochar 2023 esakal

Shani Rashi Gochar 2023 : शनि ग्रहाचं राशी परिवर्तन फार महत्वाचं मानलं जातं. ज्योतिष शास्त्रानुसार शनि हा सगळ्यात मंद गतीने चालणारा ग्रह आहे. तेव्हा शनि ग्रहाच्या राशी परिवर्तनाचा मीन राशीवर काय प्रभाव असेल ते जाणून घेऊया.

ज्योतिष शास्त्रानुसार दर अडीच वर्षांनी शनि ग्रहाचे राशी परिवर्तन होते. शनि ग्रहाच्या दोन राशी आहेत. शनि राशीच्या परिवर्तनाने मीन राशी असलेल्या लोकांच्या व्यवसाय, करियर आणि आर्थिक स्थितीवर काय परिणाम होऊ शकतो ते आपण जाणून घेऊया.

व्यवसाय आणि नोकरी

शनि मीन राशीच्या द्वादश भावात गोचर करेल. हा काळ तुमच्यासाठी चढता उतरता असू शकतो. ज्या लोकांचा व्यवसाय विदेषाशी संबंधित आहे त्यांच्यासाठी हा काळ महत्वाचा आहे. त्यांना लाभ प्राप्त होईल. मात्र प्रवास करताना तुम्हाला सावध राहावे लागेल. गुंतवणुक करताना विचारपूर्वक करा. कुठल्याही कागदपत्रांवर वाचल्याशिवाय सही करू नका. मीन राशीच्या लोकांवर पहिल्या चरणातील साडेसाती सुरू होणार आहे तेव्हा अशांनी सावध राहावे.

रिलेशनशिप

या काळात मीन राशीच्या लोकांना कामाच्या निमित्ताने त्यांच्या कुटुंबियांच्या दूर जावे लागेल. तेव्हा कुटुंबियांना चिंता जाणवू शकते. तेव्हा तुमच्या कुटुंबियांना आनंदी ठेवण्याचा तुमचा प्रयत्न असायला हवा. तुमच्या पार्टनरसोबत वेळ घालवा. सोबतच तुमच्या कुटुंबात एखाद्याची प्रकृती खालावू शकते. संपत्तीला घेऊन वाद होऊ शकतात.

Shani Rashi Gochar 2023
Shani Amavasya 2023 : आज शनि अमावस्या, या पाच राशीच्या लोकांनी करावे 'हे' उपाय, उजळेल नशीब

शिक्षण

जे लोक न्यायालयाशी संबंधित शिक्षण घेत आहेत त्यांच्यासाठी हा काळ चांगला आहे. जे लोक विदेशात नोकरी करताय त्यांच्यासाठीसुद्धा हा काळ चांगला असणार आहे. चुकीची संगत करू नका. या काळात तुमचं लक्ष शिक्षणावर केंद्रित करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com