Shukra Gochar 2023 : या 6 राशींची लागली लॉटरी! ग्रहमानात होणार असा बदल की पडेल पैशांचा पाऊस

आज आपण जाणून घेऊया की शुक्राच्या कोणत्या संक्रमणामुळे कोणत्या राशींवर परिणाम होईल
Shukra Gochar 2023
Shukra Gochar 2023esakal
Updated on

Shukra Gochar 2023 : शुक्र हा धन, विलास आणि सौंदर्याचा ग्रह मानला जातो. 15 फेब्रुवारीला शुक्र मीन राशीत प्रवेश करेल. 12 मार्चपर्यंत तो या राशीत राहील. ज्योतिष शास्त्रानुसार मीन राशीत शुक्राचे हे संक्रमण खूप महत्वाचे आहे कारण मीन राशीत शुक्र उच्च आहे. शुक्र भौतिक सुख प्रदान करतो, तेव्हा ज्या राशींत शुक्राचा प्रवेश होतो त्या राशींचे भाग्य खुलते. त्याला सर्व सुख-सुविधा मिळतात. आज आपण जाणून घेऊया की शुक्राच्या कोणत्या संक्रमणामुळे कोणत्या राशींवर परिणाम होईल.

कर्क राशी

शुक्राचे संक्रमण कर्क राशीत भाग्याच्या घरात असेल. बृहस्पति देखील येथे उपस्थित आहे, त्यामुळे तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. अडचणी कमी होतील आणि पैसेही मिळतील. पैशांअभावी एखादे काम थांबले असेल तर तेही पूर्ण केले जाईल. नोकरी बदलूनही यश मिळू शकते. यासोबतच एक नवीन संधी तुमच्या वाट्याला येऊ शकते.

सिंह राशी

शुक्राच्या संक्रमणामुळे तुम्हाला अचानक आर्थिक लाभ मिळू शकतो, ज्याची तुम्ही अपेक्षाही करणार नाही. जर तुम्ही आधीच कोणतीही गुंतवणूक केली असेल तर आर्थिक बाजू मजबूत होऊ शकते.

कन्या राशि

कन्या राशीच्या लोकांच्या व्यवसायात वाढ होईल. लाइफ पार्टनरसोबत कुठेतरी फिरण्याची योजना बनू शकते. याशिवाय नोकरीत प्रमोशनही मिळू शकते. तब्येतही सुधारेल. लोक तुमच्याकडे आकर्षित होतील आणि तुमचे व्यक्तिमत्वही उजळेल.

Shukra Gochar 2023
Magh Pornima 2023 : माघ पोर्णिमेला जुळून येणार 4 शुभ योग; जाणून घ्या तिथी अन् मुहूर्त

वृश्चिक राशी

शुक्राच्या या संक्रमणामुळे तुमचे उत्पन्न वाढेल. अभ्यासासाठी परदेशात जाण्याचीही शक्यता आहे. विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे फळ मिळेल. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवायला मिळेल. हा काळ तुमच्यासाठी खूप आनंद घेऊन येईल.

Shukra Gochar 2023
Horoscope 30 January : या राशींसाठी आजचा दिवस खास, पैशांचा पडेल पाऊस

कुंभ राशी

करिअरसाठी हा काळ चांगला आहे. मालमत्तेच्या व्यवहारात फायदा होईल. लांबच्या प्रवासामुळे आर्थिक लाभाचे योग येतील. घरात एखादे कार्यक्रम किंवा लग्न होऊ शकते. बँक बॅलन्सही वाढेल.

मीन

शुक्राचे हे संक्रमण तुम्हाला फायद्याचे ठरेल. जर तुम्हाला नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्हाला त्यात फायदा होईल. व्यवसाय वाढवण्याचे नियोजन केल्याने परिणामही मिळतील. याशिवाय वैवाहिक जीवनातही आनंद राहील. (Horoscope)

डिस्क्लेमर - वरील लेख माहितीवर आधारलेला असून सकाळ समुह याची पुष्टी करत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com