Taurus Horoscope : तुमची वृषभ रास आहे? जाणून घ्या कसा असेल जोडीदार

या राशीचा स्वामी शुक्र आहे पृथ्वी तत्वाची ही रास आहे ही बहुप्रसव रास आहे.
Taurus Horoscope
Taurus Horoscope sakal
Updated on

- सौ. कानन माधव काकरे

( ज्योतिष तज्ञ आणि टॅरोट कार्ड रीडर)

ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक रास ही त्या त्या राशींच्या लोकांचा स्वभाव सांगते. त्यामुळे राशीचक्रातील प्रत्येक राशीचा हा संबंधीत व्यक्तींवर प्रभाव पडत असतो. राशीचक्रातील बारा राशींचे वेगवेगळे स्वभाव आणि गुण आहे. आज आपण वृषभ राशीविषयी जाणून घेणार आहोत.

वृषभ ही राशीचक्रातील दुसरी रास आहे. धडधाकट बैल या राशीचे आकृती आहे. भरपूर शक्ती आणि स्वभाव आणि शांत असे सामान्यता बैलाचे स्वरूप आहे. या राशीचा स्वामी शुक्र आहे पृथ्वी तत्वाची ही रास आहे ही बहुप्रसव रास आहे. (Taurus Horoscope nature and personality astrology )

या राशीचा स्वभाव यांचे पाय जमिनीवर असतात व्यवसाय नोकरी जागा वरचेवर न बदलण्याचा स्वभाव असतो मैत्रीला व शब्दाला हे लोक पक्के असतात. श्रद्धा व निष्ठा याबाबतीत तत्व प्रधान असतात अनुयायी म्हणून ही रास अत्यंत चांगली आहे. आपल्या नेत्याला आपली निष्ठा समर्पण केलेली असते. त्यामध्ये असतील पण नसतो घेतलेला निर्णय आला तटस्थ राहण्याचा यांचा स्वभाव असतो.

Taurus Horoscope
Astrology : 'या' चार राशीचे लोक कधीच कुणाचे चांगले मित्र होऊ शकत नाही

वृषभ राशीचे लोक नेहमी आनंदी आशा मध्ये असतात त्यांची सुखाची अभिलाषा मोठ्या प्रमाणावर असते. शांतता यांचा मोज स्वभाव आहे यांना भांडण तंटा करणे आदळापट करणे उगाचच वाद घालत बसने यांच्या स्वभावात बसत नाही हे अत्यंत सोशिक असतात त्यांचं बोलणं नेहमी गोड अर्जवी प्रेमळ असते.

यांच्या या स्वभावामुळे हे सर्वांना हवे हवेचे असतात. या राशींवर शुक्र या ग्रहाचा अंमल असल्यामुळे त्यांच्याकडे लोक नेहमी आकर्षित होत असतात त्यांच्याकडे आकर्षण शक्ती भरपूर असते या राशी कडे विनयशीलता नम्रता प्रेमळपणा हे गुण आहे ही रास रसिक आहे. साहित्य कला संगीत नाट्य चित्रपट यांची यांना खूप आवड असते या क्षेत्रातही वृषभ राशीचे लोक आपणास बघायला मिळतात.

Taurus Horoscope
Astrology: दृष्ट काढताना पोळी किंवा भाकरीचा तुकडा का ओवाळून टाकतात?

या लोकांना दाग दागिने अत्तरे, उंची कपडे सर्व चांगल्या वस्तूंचा उपभोग घेणे, नेहमी आपल्या पुढे पुढे करणारी लोकं खूप आवडत असतात. विलासी राहण्याकडे यांचा जास्तीत जास्त कल असतो. वृषभ ही संस्था प्रिया रास आहे यांची ओढ आपल्या घराकडे जास्त असते पत्नी मुले परिवारातली सर्व आपले मित्र परिवार व्यवस्थित राहावे चांगले राहावे याकडे जास्त त्यांचा ओढा असतो. या लोकांना मित्रमंडळी खूप असतात. त्यांचे आदरातिथ्य करणे यांना खूप आवडत असते.

सहशिलता आणि सोशिक स्वभावामुळे आणि सेवाभावी वृत्तीमुळे सोपवलेले काम हे निष्ठेने पूर्ण करतात. ही कलेची रास असल्यामुळे कलात्मकरीत्या ही रास यांची कामे छान रीतीने साकारतात. कोणत्याही संस्थेचा कारभार उद्योगसमूहाचा कारभार ट्रस्टचा कारभार हे उत्कृष्टपणे करू शकतात निस्वार्थीपणे निस्वार्थ भावनेने ही त्यांची कामे करत असतात.

Taurus Horoscope
Dream Astrology : नेतेमंडळी स्वप्नात येतात का? जाणून घ्या कारण

मृगजला मागे धावण्याचा स्वभाव नसतो यांचा महत्त्वकांक्षी असा काही स्वभाव नाही. ही रास कौटुंबिक जीवन स्वास्थ समाधान आराम शांतता यांना अधिक किंमत देतात यांच्या या गोष्टीसाठी मोठी किंमत मोजात असतात यांच्याकडे संग्रह शक्ती आहे व्यवहार कुशलता आहे व्यापारी वृत्ती आहे पैशाचे मोल त्यांना समजलेले असते प्रवासाची इतकी आवड नसते त्यांचा स्वभाव थोडा हट्टी असतो यांच्या सुप्त शक्ती भरपूर असते या सर्व गुणांमुळे वृषभ राशीची पती किंवा पत्नी मिळणे हे भाग्याचे लक्षण असते.

ही रास बिघडली की खालील दोष निर्माण होतात सर्वात मोठा दोष आळस ऐशराम, आडमुठेपणा ,हट्टीपणा आहे. हेकेखोरपणा, विलासी वृत्ती हे आहेत. तसेच काही वेळा ही रास इतरांना कधीही लवकर क्षमा करत नाही त्यांच्या मनात सतत सुडायची भावना प्रज्वलित राहत असते त्यामुळे एखाद्याचा समूळ नायनाट केल्याशिवाय त्यांच्या मनाला शांती लाभत नाही.

Taurus Horoscope
Love Horoscope : जोडप्यांसाठी आजचा दिवस आनंदाचा अन् रोमांसने भरलेला

या वृषभ राशीच्या व्यक्तींचे सिंह, कन्या, वृश्चिक, मकर ,मीन या राशींन बरोबर पार्टनरशिप भागीदारी किंवा होणारे भविष्यातील आपले जोडीदार या राशीचे निवडावेत. या राशींच्या जोडीदाराबाबतीत कल्पना म्हणजे आपल्या पुढे पुढे करणे आपल्यावर भरपूर प्रेम करणे आपल्याला सुखी व आनंद ठेवून अशा असतात जर सांगितलेल्या राशन पैकी त्यांनी जोडीदार निवडला किंवा मित्रमंडळी किंवा भागीदारातील पार्टनर निवडला तर त्यांच्या अपेक्षा चांगल्या रीतीने पूर्ण होतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com