प्रेमभूमीत उद्यापासून सुरु होणार होळीचा उत्सव

प्रेमाचं प्रतीक असलेल्या भगवान श्रीकृष्ण-राधा यांची प्रेमभूमी ब्रजमध्ये रंग आणि आनंदाचा सण अर्थात होळीच्या उत्सवाला ५ फेब्रुवारीपासून सुरूवात होत आहे.
Holi Utsav
Holi UtsavSakal
Updated on

प्रेमाचं प्रतीक असलेल्या भगवान श्रीकृष्ण-राधा (Lord Shrikrishna- Radha) यांची प्रेमभूमी ब्रजमध्ये (Braj) रंग आणि आनंदाचा सण अर्थात होळीच्या (Holi) उत्सवाला ५ फेब्रुवारीपासून सुरूवात होत आहे. यादिवशी वसंत पंचमी आहे. यासोबतच ब्रजमध्ये चाळीस दिवसांच्या 'फाग महोत्सवा'ची सुरुवात होणार आहे. या काळात विविध कार्यक्रमांचे आयोजन केलं जाते. भाविक मोठ्या श्रद्धेनं भक्तीरसात रंगून जातात. मंदिरात रसिया गायन सुरू होते. या होळीत (Holi) सहभागी होण्यासाठी देश-विदेशातून अनेक भाविक येतात. (The Holi festival will start from tomorrow in Braj.)

Holi Utsav
येथे ग्राहक पेठ उत्सव कोणाच्या आर्शिवादाने चालतात ?

दरवर्षी वसंत पंचमीपासून ब्रजमध्ये होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या साणाची भाविक वर्षभर वाट पाहत असतात. देशविदेशातील अनेक श्रद्धाळू या काळात येथे भेट देत असतात. भगवान श्रीकृष्ण-राधा यांच्या भक्तीमध्ये भाविक न्हाऊन निघतात आणि मंदिरांमध्ये होळीचा आनंद लुटतात. वसंत पंचमीला ठाकुरजींसमोर अबीर-गुलाल उधळला जातो. सर्वप्रथम रामनरेतीत होळी साजरी केली जाते. यानंतर होलिकाष्टक सुरू होताच होळीची मजा. १० मार्च रोजी होलिकाष्टक साजरी होत आहे. बरसाणाच्या लाथामार होळीत भाविक श्रद्धेच्या रंगात रंगून जातात. बरसानाचे आकाश रंगीबेरंगी ढगांनी व्यापले आहे. श्रीकृष्ण-राधाच्या भक्तीत भाविक नाचू लागतात. अबीर-गुलालाच्या उधळणीत भक्तीचा रंग चढतो. रंगभरणी एकादशीला भाविक मंदिरांमध्ये रंगांच्या होळीचा आनंद घेतात.

Holi Utsav
मन मंदिरा... : उत्सव अंतरंगातला

होळीनिमित्त असा असतील कार्यक्रम-

6 मार्च - रमणरेती होळी

10 मार्च - बरसाणाची 'लाडू होळी'

11 मार्च - बरसाणाची 'लठामार होळी'

12 मार्च - नांदगावची 'लठामार होळी'

13 मार्च - रावळची 'लठामार होळी'

14 मार्च - श्रीकृष्णाच्या जन्मस्थानी होळीचा उत्सव

14 मार्च - रंगभरणी एकादशीला द्वारकाधीश मंदिरात होळी

15 मार्च - गोकुळची छडीमार होळी

23 मार्च - चौरासी खांभा मंदिराचा हुरंगा

द्वारकाधीश मंदिराचे माध्यम प्रभारी ऍड. राकेश तिवारी यांनी सांगितले की, वसंत पंचमीला ठाकुरजींसमोर अबीर गुलाल अर्पण केला जाईल. 15 मार्च रोजी छडीमार होळीचे आयोजन करण्यात येणार असल्याचे गोकुळ मंदिराचे सेवक मथुरादास पुजारी यांनी सांगितले. बरसाना मंदिराचे सेवक सुरेशचंद्र गोस्वामी यांनी सांगितले की, 10 मार्च रोजी लाडू होळी आणि 11 मार्चला लाथामार होळीचे आयोजन केले जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com