यंदा 27 ऑगस्टला गणेश चतुर्थी असून बाप्पाच्या आगमनाचा सोहळा दहा दिवस साजरा होणार आहे.यावर्षीच्या गणेश उत्सवात पाच महाशुभ योग (सर्वार्थ सिद्धी, रवी, ब्रह्म, इंद्र आणि प्रीती योग) तयार होत आहेत.या योगांमुळे 5 राशींवर विशेष शुभ परिणाम होईल..Marathi Rashi Bhavishya : यंदा 27 ऑगस्टला गणेश चतुर्थी आहे. घरोघरी बाप्पाचं आगमन होणार आहे. या दिवशी अनेकांच्या घरी बाप्पाचं आगमन होणार आहे. बाप्पा हे सुख आणि समृद्धीचे दाता आहेत. या काळात भक्त भाविकांची सेवा करतात. पण यंदाची गणेश चतुर्थी खास आहे कारण यावेळी पाच महायोग बनत आहेत. .ज्योतिष शास्त्रानुसार यंदाच्या दहा दिवसाच्या गणेश उत्सवात 5 महाशुभ योग बनत आहेत. याचा परिणाम 5 राशींवर होणार आहे. कोणत्या आहेत या राशी जाणून घ्या. .यंदा येत्या दहा दिवसात सर्वार्थ सिद्धी योग, रवी योग, ब्रह्म योग, इंद्र योग आणि प्रीती योग तयार होतोय. ही गणेश चतुर्थी अनेकांना भाग्यशाली ठरणार आहे. .मेष रास :ज्योतिष शास्त्रानुसार यंदाची गणेश चतुर्थी मेष राशीच्या लोकांसाठी शुभ राहील. तुमचा आत्मविश्वास वाढेल. गणपती बाप्पाच्या नावाने तुम्ही केलेली सगळी कामं यशस्वी होतील. गुंतवणुकीसाठी उत्तम संधी आहे. तुम्हाला नवीन संधी मिळेल. .कर्क रास :ज्योतिष शास्त्रानुसार, गणपती बाप्पाच्या कृपेने कर्क राशीच्या लोकांना करिअरमध्ये नवीन संधी मिळतील. तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल. प्रगतीच्या नवीन संधी मिळतील. तुम्हाला प्रसिद्धी मिळेल आणि आर्थिक स्थिती सुधारेल. .तूळ रास : ज्योतिष शास्त्रानुसार, हा योग तूळ राशीच्या लोकांना सकारात्मक परिणाम मिळेल. वैयक्तिक आयुष्यही चांगले राहील. अविवाहित लोकांना जोडीदार मिळेल. लग्न निश्चित जमेल. अडकलेली कामं पूर्ण होतील. .मकर रास : मकर राशीच्या लोकांना चांगली काम मिळतील. एखादी शुभ वार्ता मिळेल ज्यामुळे तुम्ही आनंदी व्हाल. अडकलेले पैसे मिळाल्याने दिलासा मिळेल. बँक बॅलेन्स वाढेल. तुम्ही सहलीला जल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला पाठींबा मिळेल आणि तुमचं कौतुक होईल. .कुंभ रास :ज्योतिष शास्त्रानुसार, कुंभ राशीच्या लोकांचं उत्पन्न वाढेल. तुम्हाला पैसे मिळतील. तुम्हाला व्यवसायात फायदा होईल. तुम्ही गुंतवणूक कराल. तुम्हाला सन्मान मिळेल. पैसे वाचवण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. .FAQs :Q1. यंदा गणेश चतुर्थी कधी आहे?👉 27 ऑगस्ट 2025 रोजी गणेश चतुर्थी आहे.Q2. या वर्षी गणेश चतुर्थी का विशेष आहे?👉 कारण या वर्षी 5 महाशुभ योग तयार होत आहेत जे अत्यंत दुर्मिळ मानले जातात.Q3. कोणते योग तयार होत आहेत?👉 सर्वार्थ सिद्धी योग, रवी योग, ब्रह्म योग, इंद्र योग आणि प्रीती योग.Q4. या योगांचा कोणत्या राशींवर जास्त परिणाम होणार आहे?👉 मेष, कर्क, तूळ, कुंभ आणि मकर या राशींवर.Q5. भक्तांनी या काळात काय करावं?👉 गणपतीची पूजा, मंत्रजप, व्रत, आणि दहा दिवस बाप्पाची सेवा करून आशीर्वाद मिळवावा..Hartalika 2025 : यंदाची हरतालिका ठरणार या राशींसाठी शुभ, गौरी-शंकराची होणार कृपा !.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.