Vat Purnima : वट पौर्णिमेला पुजल्या जाणाऱ्या वडाचे एवढे फायदे माहितीयेत?

वट पौर्णिमेला वडाच्या झाडाला पूजलं जातं. आपल्या पुराणात सांगितलेल्या अनेक महात्म्यांनी याच झाडाखाली साधना केल्याचे दाखले आहेत.
Vat Purnima
Vat Purnimaesakal

Importance Of Banyan Tree : भारतीय संस्कृतीत लावून दिलेल्या रुढी परंपरा, व्रत वैकल्यांमागे नेहमीच काहीतरी शास्त्रीय कारण असतं. हिंदू धर्मातल्या परंपरा या कायमच निसर्गाशी जोडलेल्या आहेत. त्यामुळेच नैसर्गिकरित्या दीर्घायुष्य लाभलेल्या वड, पिंपळ, उंबर अशा झाडांची पूजा, त्यांच्या ठायी विशिष्ट देवतेचे अधिष्ठान हे सर्व त्याच दिशेने इशारा करतं.

एखादा वृक्ष, प्राणी यांना पवित्र ठरवले तर त्यांची तोड, कत्तल सहसा केली जात नाही. असच महत्व वडाच्या झाला आहे. ज्यामागे सावित्रीने पती सत्यवानाचे प्राण परत आणण्यासाठी वडाच्या झाडाखाली तप करून त्याला परत मिळवले अशी कथा सांगितली जाते.

वडाच्या झाडाशी निगडीत अशा अनेक पौराणिक कथा आहेत. वडाला यज्ञीय वृक्षही म्हटलं जातं. यज्ञासाठी आवश्यक भांडी (पात्रे) याच झाडाच्या लाकडापासून बनवले जात. सृष्टी निर्माण होण्यापूर्वी प्रलयकालीन जलात भगवान विष्णू बालरुपात वडपत्रावर शयन करतात असे म्हटले जाते. या वटाच्या झाडावर ब्रह्मदेवाचा वास असतो असं म्हटलं जातं. त्यामुळे वटपौर्णिमेला सुवासिनी या वडाची पूजा करून अखंड सौभाग्य मागतात. या दाट वृक्षाला रस्तेच्या कडेला छाया मिळावी म्हणून लावले जाते.

Vat Purnima
Vat Purnima 2023 : वट पौर्णिमेला भाद्र सावट, पतीच्या दीर्घायुष्यासाठी कधी अन् कशी पूजा करावी इथे वाचा

या वृक्षाच्या उत्पत्तीविषयीही एक पौराणिक कथा आहे. शतपथ ब्राह्मण यात असलेल्या वटवृक्षाच्या उत्पत्तीच्या कथेनुसार कुरुक्षेत्री देवांनी यज्ञ केला तेव्हा सोमचमसाचे मुख त्यांनी खालच्या बाजूला करून ठेवले. त्यातून वटवृक्ष बनला असं सांगितलं जातं.

कृष्णवट नावाचा एक वडाचा प्रकार आहे. त्याची पान किंचीत वाकलेली असल्यामुळे ती द्रोणासारखी दिसतात. यामागेही एक कथा सांगितली जाते. एकदा गोपिका पुष्कळ लोणी घेऊन लाडक्या कृष्णाकडे येतात. त्यावेळ सवंगड्यांना लोणी वाटण्यासाठी त्याने वडाच्या पानांना थोडे वाकवून त्यात लोणी दिलं. तेव्हापासून या झाडाची पाने तशीच आहेत. नवीन बीजातून येणाऱ्या झाडाचे पानही तसेच येते. म्हणून याला कृष्णवट म्हटलं जातं.

Vat Purnima
Vat Purnima : वटपौर्णिमेला दारात काढा अशी खास रांगोळी, बघा डिझाइन्स
  • वडाच्या झाडाचे अनेक अध्यात्मिक आणि आयुर्वेदिक फायदे सांगितले जातात. वडाचे झाड एवढे भव्य, दाट इतरांना सावली देणारे असल् तरी तो झुकलेला असतो. असंच माणसाने विनम्र असावं असा संदेशच जणू तो देत असतो. त्याच्या पारंब्या वरून खाली येतात म्हणून या वृक्षाला न्यग्रोध म्हणतात.

  • याशिवाय याचे अनेक आयुर्वेदिक फायदेही आहेत. जर मुकामार, सूज, ठणका असेल तर त्या जागी वडाच्या झाडाच्या पानावर तेल, तूप गरम करून लावून बांधून ठेवावे.

  • पारंब्यांचा काढा शक्तीवर्धक असतो.

  • फळे बुद्धी वर्धक असतात, असे आयुर्वेदशास्त्रात सांगितले आहे.

Vat Purnima
Vat Purnima 2023 : वटपौर्णिमेसाठी खास लेटेस्ट उखाणे

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींना पाठिंबा देत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com