सात सप्टेंबर रोजी चंद्रग्रहण कुंभ राशीत होत आहे. दशमस्थानी चंद्र-राहू, चतुर्थात रवी-केतू, बुध, पंचमात मंगळ, लाभस्थानी शनी-नेपच्यून, धनस्थानी गुरू, तृतीय स्थानी शुक्र अशी ग्रहस्थिती आहे. या ग्रहणाचा परिणाम देशातील राजकीय परिस्थितीवर होणार असून, देश व राज्याच्या राजकारणात मोठा गोंधळ अनुभवास येईल. सत्ताधारी पक्ष व नेत्यांवर मोठे आरोप होतील. मोठ्या नाट्यमय घटना या काळात अनुभवास येतील, असं भाकित ज्योतिष्याचार्य सिद्धेश्वर मारटकर यांनी वर्तवलं आहे.