
Weekly Horoscope : राशींसाठी कसा असणार हा आठवडा, वाचा मेषपासून मीनपर्यंतच्या सर्व राशींचे भविष्य
Weekly Horoscope : 13 फेब्रुवारीपासून ते १९ फेब्रुवारीपर्यंत राशींसाठी हा आठवडा कसा असणार याची उत्सूकता प्रत्येकाला असते. आज आम्ही सर्व राशींसाठी हा आठवडा कसा असणार आहे, याविषयी सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया. (Weekly Horoscope : how will be a week for all zodiac signs from 13 to 19 February read story)
मेष:
18 फेब्रुवारीला येणारी महाशिवरात्री मेष राशीच्या लोकांसाठी उत्तम ठरणार आहे. नोकरी आणि कार्यक्षेत्रात विस्तार होईल. उच्च शिक्षण आणि संशोधन कार्यासाठी परदेशात जाण्याची शक्यता आहे. काही रखडलेली कामे पूर्ण होऊ शकतात. मात्र या आठवड्यात वादांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. वैवाहिक जीवनासाठी हा आठवडा चांगला आहे. आठवड्याच्या शेवटच्या दिवसात खर्चात वाढ आणि आरोग्याच्या समस्यांमुळे त्रास होऊ शकतो.
उपाय : संकटनाशन गणेश स्तोत्राचा रोज पाठ करा.
वृषभ:
उत्पन्नात वाढ होऊ शकते. प्रेमप्रकरणात जोडीदाराकडून भेटवस्तू मिळण्याची शक्यता आहे. गुरुवार आणि शुक्रवारी एकटेपणा तुम्हाला त्रास देऊ शकतो. अशा परिस्थितीत निराशा मनात येऊ देऊ नका. अशा वेळी फक्त कुटुंबच तुम्हाला साथ देणार. महाशिवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर कायदेशीर विवादित प्रकरणांमध्ये चांगली बातमी मिळू शकते. जमिनीशी संबंधित कामात यश मिळेल. घरातील ज्येष्ठांच्या आरोग्याची काळजी घ्या.
उपाय : शुं शुक्राय नमः या मंत्राचा जप करावा.
मिथुन:
महाशिवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर दान करा, तरच येणारे मोठे संकट टाळता येईल. वैवाहिक जीवन आनंददायी राहण्यासाठी आपल्या साथीदारासाठी वेळ काढा. नोकरदार महिलांना एकाच वेळी ऑफिस आणि घर दोन्ही सांभाळणे कठीण होणार आहे. मूल होण्याचा प्रयत्न करणाऱ्यांसाठी आनंदाचा काळ जवळ येत आहे. तुम्हाला तुमच्या मुलांच्या शिक्षणाची अधिक काळजी घ्यावी लागेल. कोणताही मोठा निर्णय शहाणपणाने घ्या.
उपाय : विष्णु सहस्रनाम स्तोत्राचे पठण केल्याने जीवनात शांती मिळेल.
कर्क :
या आठवड्याची सुरुवात चांगली होईल पण आठवड्याच्या शेवटी जास्त खर्च होऊ शकतो. त्यामुळे महिला वर्गाचे बजेट कोलमडणार आहे. तुम्ही व्यवसायात असाल तर अनपेक्षित नफा तुम्हाला आनंद देईल. वैवाहिक जीवनात थोडी काळजी घ्या. हा आठवडा विद्यार्थ्यांना त्यांच्या मेहनतीचे फळ देईल. तुम्हाला तुमच्या कुटुंबासोबत सहलीला जायचे असेल तर त्यासाठी हीच योग्य वेळ आहे. आई-वडिलांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या.
उपाय : नमः शिवाय मंत्राचा जप करा.
सिंह राशी:
कौटुंबिक जीवनात आनंद असणार पण सिंह राशीच्या लोकांसाठी हा आठवडा चांगला नाही. परंतु संकटाच्या वेळी तुम्हाला मित्र आणि कुटूंबीयांकडून चांगली मदत मिळेल. आजारांपासून दूर रहा आणि आरोग्याची अधिक काळजी घ्या. नोकरीच्या शोधात भटकणाऱ्या तरुणांना या आठवड्यात प्रिय व्यक्तीच्या ओळखीतून नोकरी मिळू शकते. महिला वर्गासोबत फसवणूक होऊ शकते, त्यामुळे त्यांनी काळजी घ्यावी.
उपाय : ऱ्हीं सूर्याय नम: या मंत्राचा रोज जप करावा.
कन्या :
कन्या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा सर्व चिंतांपासून मुक्त करणारा ठरू शकतो. काही कारणाने कौटुंबिक संबंध बिघडले असतील तर ते सुधारण्याचा प्रयत्न करा. भविष्यासाठी पैशांची बचत करणे खूप महत्त्वाचे ठरेल. जर तुमच्या घरी पाळीव प्राणी असतील तर काळजी घ्या. नोकरदार लोकांसाठी हा आठवडा प्रगतीचा असेल. ज्येष्ठांच्या आरोग्याविषयी कोणतीही निष्काळजीपणा करू नका.
उपाय : बुं बुधाय नम: मंत्राचा रोज जप करावा.
तूळ:
नोकरदार लोक या आठवड्यात कामाच्या प्रचंड तणावामुळे आपल्या कुटुंबाला योग्य वेळ देऊ शकणार नाहीत. जर तुम्ही स्वतःसाठी घर बांधण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला त्यात अचानक मदत मिळेल. हा आठवडा मुलींसाठी आयुष्य बदलणारा ठरेल. जर तुम्ही जीवनसाथी शोधत असाल तर जोडीदार मिळण्याच्या बाबतीत कोणताही चुकीचा निर्णय घेऊ नका. छोट्या व्यावसायिकांनी या आठवड्यात अनावश्यक खर्च करू नये. मुलांच्या आरोग्याच्या बाबतीत काळजी घ्या.
उपाय : राम रक्षा स्तोत्राचा पाठ करा.
वृश्चिक:
या आठवड्यात तुम्ही मानसिक अस्वस्थेतून जाणार. मानसिक आजाराचा परिणाम तुमच्या आरोग्यावर दिसून येईल. वेळ आज तुमच्या पाठीशी नाही, पण उद्या असेल हे लक्षात ठेवा. व्यवसायात मोठे निर्णय घेताना वडिलांचा सल्ला घ्या. या आठवड्यात तुम्हाला तुमच्या जीवनसाथीकडून खूप सहकार्य मिळेल.
उपाय : ‘अं अंगारकाय नमः’ या मंत्राचा रोज जप करावा.
धनु:
जर तुम्ही प्रेम शोधण्यासाठी आणि लग्न करण्यासाठी उत्सुक असाल तर हा आठवडा तुमच्यासाठी चांगला आहे. व्यवसायात जास्त जोखीम घेऊ नका, निर्णय घेताना विचार करा. घरातील वडीलधाऱ्यांच्या आरोग्याच्या बाबतीत पुन्हा एकदा वैद्यकीय सल्ला घ्या. नोकरदारांना जास्त दबावामुळे त्रास होईल. शेतकरी आणि कष्टकरी लोकांसाठी हा आठवडा चांगला राहील.
उपाय : दररोज दत्तकवच स्तोत्राचा पाठ करा.
मकर:
मकर राशीच्या लोकांवर भगवान शंकराची विशेष कृपा राहील. जर तुम्ही खूप दिवसांपासून नवीन वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला यश मिळेल. तुमच्या वैवाहिक जोडीदाराला आनंदी ठेवा, यातच तुमचे सांसारिक सुख दडलेले आहे. कठीण निर्णय घेताना प्रत्येक गोष्टीचा सल्ला घ्या. देवावर विसंबून राहू नका. अधिकाऱ्याच्या मदतीने रखडलेल्या प्रकरणांमध्ये आराम मिळेल. दारात येणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला रिकाम्या हाताने पाठवू नका.
उपाय : दररोज हनुमान चालिसाचे पठन करावे.
कुंभ:
या आठवड्यात कमीत कमी प्रयत्नांमध्ये अधिक यश मिळण्याची शक्यता आहे. प्रतिष्ठित व्यक्तींची भेट होण्याची शक्यता आहे. व्यावसायिकदृष्ट्या तुम्ही नवीन फ्लॅट घेऊ शकता. पण त्यासाठी कर्ज घेण्याचा विचार मनातून सोडा. चुकीच्या आर्थिक निर्णयांमुळे नंतर अडचणी निर्माण होऊ शकतात. भावनेच्या आहारी जाऊन कोणतेही काम करू नका. विद्यार्थी वर्गाला या आठवड्यात जास्त मेहनत करावी लागेल. महिलांसाठी हा आठवडा चांगला राहील.
उपाय : दररोज शंकराचे दर्शन घ्या.
मीन :
वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात यश मिळेल. महागड्या गॅजेट्सवर अनावश्यक खर्च करू नका. ज्येष्ठांना धार्मिक यात्रेला जाण्याची सुवर्णसंधी मिळू शकते. शेतकरी वर्गासाठी हा आठवडा चांगला राहील. छोट्या व्यापाऱ्यांनी व्यवहाराच्या बाबतीत अत्यंत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. तरुणांनी वाहन चालवताना काळजी घ्या.
उपाय : बृं बृहस्पत्ये नमः या मंत्राचा रोज जप करावा.