यूपीत सोन्याचे घबाड; ३३५० टन सोन्याची सापडली खाण!

शरद प्रधान
Friday, 21 February 2020

भारताकडे ६२६ टन सोन्याचा साठा असून, परकी गंगाजळीच्या तो ६.६ टक्के इतका आहे.

नवी दिल्ली : तब्बल दोन दशकांच्या शोधमोहिमेनंतर उत्तर प्रदेशातील सोनभद्र जिल्ह्यात सोन्याच्या दोन खाणी सापडल्या आहेत. भारतातील सोन्याच्या साठ्याच्या पाचपटीहून अधिक सोने या खाणीत असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

जिओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया (जीएसआय) आणि उत्तर प्रदेश भूगर्भशास्त्र व खाण संचालनालय विभागाला या खाणी सापडल्या आहेत. या खाणींमधील सोन्याचा साठा जवळपास ३५६० टन इतका आहे. हा साठा देशातील सध्याच्या सोन्याच्या साठ्याच्या पाचपट आहे. भारताचा सध्याचा सोन्याचा साठा जवळपास ६२६ टन इतका आहे.

- 'त्या' भरतीला विद्यार्थ्यांचा विरोध कायम; 'एमपीएससी'कडे भरती देण्याची मागणी

‘या खाणी भाडेतत्त्वार देण्यासंदर्भात सरकार विचार करते आहे. दोन ठिकाणी सोन्याचे साठे सापडले आहेत. सोनपहाड आणि हर्दी या दोन ठिकाणी हे साठे आहेत. जीएसआयच्या अंदाजानुसार सोनपहाड येथील सोन्याचा साठा २९१३.२६ टन इतका असून, हर्दी येथे ६४६ टन सोन्याचा साठा अपेक्षित आहे,’ अशी माहिती खाण अधिकारी के. के. राय यांनी दिली. 

- Namaste Trump:फर्स्ट लेडी मेलानिया यांच्या गिफ्टचं गुजरात, महाराष्ट्राशी कनेक्शन

भूगर्भशास्त्र व खाण संचालनालय विभागाचे संचालक रोशन जेकब यांनी या खाणींसाठी टेंडर काढण्यासाठी आराखडा तयार करण्याचे काम सात सदस्यांच्या समितीकडे सोपविले आहे. ही समिती सोन्याच्या खाणींचे नकाशे बनवून पुढील प्रक्रिया करणार आहे. सोन्याव्यतिरिक्त युरेनियमसारख्या इतर दुर्मीळ खनिजांचाही शोध घेतला जातो आहे. बुंदेलखंड आणि विंध्य विभाग सोने, हिरे, प्लॅटिनम, चुनखडी, ग्रॅनाइट, फॉस्फेट, क्वार्ट्‌झ आणि चिनी माती या खनिजांनी संपन्न आहेत.

- पाकिस्तान झिंदाबाद म्हणणाऱ्या, अमुल्यानं दिल्या होत्या शिवजयंतीच्या शुभेच्छा!

भारताकडे ६२६ टन सोन्याचा साठा असून, परकी गंगाजळीच्या तो ६.६ टक्के इतका आहे. जगात सर्वाधिक सोन्याचा साठा अमेरिकेकडे असून, तो ८१३३.५ टन आहे. त्याखालोखाल जर्मनीकडे ३३६६ टन सोन्याचा साठा आहे. तर इटलीकडे २४५१.८ टन, फ्रान्सकडे २४३६ टन, रशियाकडे २२४१.९ टन, चीनकडे १९४८.३ टन, स्वित्झर्लंडकडे १०४० टन आणि जपानकडे ७६५.२ टन सोन्याचा साठा आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 3350 tonne gold mine found in Uttar Pradeshs Sonbhadra area