युतीच्या नादाला लागू नका; राज ठाकरेंचे मनसैनिकांना सूचना

निवडणूक स्वबळावर लढण्याचे आदेश दिल आहेत - संदीप देशपांडे
Raj Thackeray
Raj Thackerayesakal
Summary

निवडणूक स्वबळावर लढण्याचे आदेश दिल आहेत - संदीप देशपांडे

मनपा निवडणुकांसाठी कामाला लागा. युतीच्या नादाला लागू नका असे आदेश मनसे प्रमुख राज ठाकरेंनी मनसैनिकांना दिले आहेत. (Raj Thackeray) आज मनसेच्या बैठकीत त्यांनी कार्यकर्त्यांना आदेश दिल्याचे मनसेचे संदीप देशपांडे यांनी सांगितले. राज ठाकरे स्वतः लोकसभा क्षेत्रनिहाय निवडणूका लढणार असून ही निवडणूक स्वबळावर लढण्याचे आदेश मिळाले आहेत असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. (BMC)

Raj Thackeray
केंद्रीय अर्थसंकल्प म्हणजे फ्लॉप चित्रपट - संजय राऊत

संदीप देशपांडे म्हणाले, विधानसभा लोकसभावार कमिटी स्थापन करून बैठका घेणार आहे. यावेळी गटाध्यक्षांच्या बैठक घेणार आहे. कमिटी १५ फेब्रुवारीपर्यंत अहवाल देणार असून भाजपासोबत किंवा अन्या कोणत्याही पक्षासोबत युती नको असे आवाहन राज ठाकरे यांनी केले आहे. स्वबळावर निवडणुका लढण्याची तयारी करण्याचे आदेश मिळाले आहेत. शिवसेनेने (Shivsena) प्रभागरचना जरी बदलली तरी लोकांची नाराजी बदलणार नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.

पुढे ते म्हणाले, शिवसेनेसोबत मराठी माणसं, हिंदू लोकं आहेत का? कितीही प्रभाग रचना बदलल्या तरीही ते आजचं मरण उद्यावर ढकलंत आहेत, पण मरण अटळ आहे. मुंबई महापालिका निवडणूक ही महाविकास आघाडी विरोधातील लढा असेल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. मुंबईचे महत्व कमी करणे कोणाच्या बापाला जमले नाही आणि यापुढे जमणार नाही, असेही त्यांनी यावेळी ठणकावून सांगितले.

Raj Thackeray
महापालिका प्रभागरचना जाहीर होताच मुंबईत मनसेची बैठक; घडामोडींना वेग

मुंबई महानगरपालिकेची नवी प्रभाग रचना काल जाहीर झाल्यानंतर आता राजकीय वर्तुळातील घडामोडींना वेग आला आहे. दरम्यान आता मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्याकडून पक्षाच्या हालचालींना वेग आला आहे. मुंबईच्या एमआयजी क्लबमध्ये आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (MNS) पदाधिकाऱ्यांची तातडीने महत्त्वाची बैठक बोलवण्यात आली आहे. मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक आणि ठाण्यातील मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. गेल्या निवडणुकीप्रमाणे ही लढत अटीतटीची होऊन शिवसेना आणि भाजपच्या (BJP) जागांमध्ये थोडक्या जागांचा फरक असेल तर सत्ता स्थापनेत मनसे हा पक्ष किंगमेकरची भूमिका बजावू शकतो, अशी चर्चा सुरु आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com