इटली-अमृतसर चार्टर्ड विमानातील 125 प्रवाशी कोरोना पॉझिटिव्ह

इटलीत टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतर येथे टेस्ट पॉझिटिव्ह कशी आली? असा सवाल प्रवाशांनी केला आहे.
Flight
FlightANI

अमृतसर : इटली-अमृतसर चार्टर्ड विमानातील 125 प्रवाशी कोरोना पॉझिटिव्ह (Corona Positive) आढळून आले आहेत, अशी माहिती अमृतसर विमानतळाचे संचालक व्ही. के. सेठ यांनी दिली आहे. याबाबत एएनआयने ट्वीट केले आहे. या विमानात 179 प्रवासी होते त्यापैकी 125 जणांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. दरम्यान, पॉझिटिव्ह आलेल्या प्रवाशांना संस्थात्मक विलगीकरणासाठी पाठवले जाणार असल्याचे, राज्य आरोग्य अधिकार्‍यांनी सांगितले आहे. दरम्यान, पॉझिटिव्ह आलेल्या प्रवाशांना संस्थात्मक विलगीकरणासाठी पाठवले जाणार असल्याचे, राज्य आरोग्य अधिकार्‍यांनी सांगितले असून, इटलीमध्ये कोविड टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतर देखील येथे कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह कशी आली? असा सवाल अनेक प्रवाशांनी केला आहे.

नव्या कोरोना गाईडलाईन्सनुसार विदेशातून भारतात (International Flight ) दाखल होणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची विमानतळांवर कोरोनो टेस्ट केली जात आहे. दरम्यान, ज्यावेळी हे विमान अमृतसर विमानतळावर लँड झाले त्यानंतर यातील सर्व प्रवाशांची कोरोना टेस्ट करण्यात आली. त्यात 125 जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. (125 Passengers Of Air India Italy-Amritsar Flight Tested Positive) गेल्या काही दिवसांपासून देशात कोरोना आणि ओमिक्रॉनच्या रूग्णसंख्येत झापाट्याने वाढ होत आहे. त्या अनुशंगाने विदेशातून भारतात येणाऱ्या प्रवाशांची कोरोना टेस्ट विमानतळांवर करण्यात येत आहे. तसेच धोका असणाऱ्या देशांमधून येणाऱ्या प्रवाशांवर अधिक बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. (Corona Test On Airport)

Flight
राज्यात वीकेंड लॉकडाऊन, नाईट कर्फ्यू लागणार का? राजेश टोपेंनी केलं स्पष्ट

देशात 24 तासात कोरोनाचे 90,928 रुग्ण

देशभरात कोरोनाचा (Covid 19 Cases In India) कहर सुरुच असून तिसऱ्या लाटेला सुरुवात झाल्याचं चित्र आहे. मागील 24 तासात देशात 90 हजार 928 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीत ही गंभीर बाब समोर आली आहे. दुसऱ्या लाटेनंतरची सर्वाधित आकडेवारी आहे. येणाऱ्या काळात ही संख्या वाढल्यास तिसऱ्या लाटेचा फटका देशाला बसू शकतो. एकीकडे कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना त्यात ओमिक्रॉन (Omicron) या नव्या व्हेरिअंटच्या रुग्णांचेही प्रमाण वाढत आहे. सध्या देशात ओमिक्रॉनचे 2,630 रुग्ण आहेत. सर्वाधिक ओमिक्रॉनचे रुग्ण हे महाराष्ट्रात 797 इतके आहेत. त्याखालोखाल दिल्लीत 485 तर, राजस्थानात 236 रुग्ण आहेत. केरळमध्ये 234, गुजरातमध्ये 204 आणि तामिळनाडुत 121 ओमिक्रॉन बाधितांची नोंद झाली आहे. (Omicron Cases Count In India)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com