देशातील १४ कोटी जणांना संसर्गाची बाधा होऊन गेली?

Death-Rate
Death-Rate

नवी दिल्ली - सुमारे एक अब्ज ३५ कोटी लोकसंख्येच्या भारतात कोरोना संसर्गाचा उद्रेक झाल्यानंतर म्हणजे ऑगस्ट अखेरपर्यंत सुमारे १४ कोटी नागरिकांना कोरोनाचा संसर्ग होऊन गेला असल्याचे निरीक्षण भारतीय आरोग्य संशोधन परिषदेने (आयसीएमआर) आज नोंदवले. म्हणजेच, दर १५ लोकांमागे एकजण (लक्षणे दिसत असली-नसली तरी) कोरोनाबाधित झालेला असावा, असे ‘आयसीएमआर’ आज व्यक्त केले. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

ऑगस्टपासून प्रचंड वाढलेला कोरोनाचा संसर्ग देशात अजूनही कायम आहे. देशात सध्या प्रती १० लाख लोकसंख्येमागे ७० जण मृत्युमुखी पडतात. याची जागतिक सरासरी १२७ असून भारतात सर्वांत कमी कोरोनाचा मृत्यू दर असल्याचा दावाही आरोग्य यंत्रणांनी केला आहे. महाराष्ट्रासह सहा राज्यांतील बाधितांची संख्या वाढण्याचा कल कायम असल्याचेही सांगण्यात आले.

आरोग्य सचिव राजेश भूषण व आयसीएमआरचे महासंचालक डॉ. बलराम भार्गव यांनी आज भारतातील कोरोना परिस्थितीबाबतची अपडेट दिली. मात्र देशात सामूहिक संसर्ग (कम्युनिटी स्प्रेड) सुरू झालेला नाहीच, या दाव्यावर केंद्र सरकार अजूनही कायम आहे. 

शहरांतील संसर्ग अधिक
विशेषतः शहरी भागांत, झोपडपट्टी व दाट वस्तीच्या परिसरांत चाचण्या व नंतर उपचारांचे प्रमाण कमी आहे ते वाढविण्याची नितांत गरज आहे. ग्रामीण भागांच्या तुलनेत शहरांतील कोरोनाचा संसर्ग चौपट  असल्याचे आढळून आले. किमान अटकाव करण्यासाठी राज्य सरकारांनी आणखी सावधगिरी बाळगून व विविध सणांच्या दिवशी गर्दी जमण्याची शक्‍यता लक्षात घेऊन प्रसार रोखण्यासाठी वेगवेगळी कंटेन्मेंट रणनीती तयार करावी अशा सूचनाही केंद्राने केल्या आहेत. देशात मार्चमध्ये दरमहा ३० हजार चाचण्या होत होत्या आजमितीस त्यांची संख्या (सप्टेंबरमध्ये) २ कोटी ९७ लाखांवर पोहोचली आहे. देशात सध्या १८३६ प्रयोगशाळा आहेत. 

‘५-टी’ रणनीतीवर भर
डॉ. भार्गव म्हणाले की, ‘‘ देशाच्या लोकसंख्येचा मोठा भाग कोरोनाबाधित असू शकतो. दुसऱ्या राष्ट्रीय सिरो सर्वेक्षणानुसार १० वर्षांच्या पुढील वयोगटातील दर १५ मागील १ भारतीय बाधित झाल्याचा अंदाज आहे. सणासुदीचे दिवस तोंडावर असताना या परिस्थितीत ५-टी रणनीतीवर (टेस्ट, ट्रॅक, ट्रेस, ट्रीट, टेक्‍नोलॉजी) जास्त भर द्यायची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com