esakal | 15 वर्षाच्या मुलाने मोबाइल हॅक करून उकळले पैसे
sakal

बोलून बातमी शोधा

online fraud through mobile app

एका 15 वर्षाच्या मुलाने हॅकिंगच्या माध्यमातून लोकांचा डेटा चोरी करून त्यांना ब्लॅकमेल केल्याचा प्रकार समोर आला आहे.

15 वर्षाच्या मुलाने मोबाइल हॅक करून उकळले पैसे

sakal_logo
By
सूरज यादव

सध्या भारतात पेगॅससवरून पाळत ठेवल्याच्या प्रकरणाची चर्चा सुरु आहे. दरम्यान, मध्य प्रदेशात एका 15 वर्षाच्या मुलाने हॅकिंगच्या माध्यमातून लोकांचा डेटा चोरी करून त्यांना ब्लॅकमेल केल्याचा प्रकार समोर आला आहे. सिंगरौलीमध्ये हा प्रकार घडला असून पोलिसांनी याबाबतची माहिती दिली आहे. सिंगरौलीमध्ये बसलेल्या या मुलाने आपलं लोकेशन युएई असल्याचं सांगून भारतात बंदी असलेली अॅप्स डाऊलोड केली होती. त्यातून त्यानं काही लोकांचे मोबाईल फोन हॅक केले. त्यानंतर खासगी माहिती चोरून लोकांना ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली.

सिंगरौलीचे पोलिस अधीक्षक विरेंद्र कुमार सिंह यांनी सांगितलं की, एका सराईत गुन्हेगाराप्रमाणे 15 वर्षांच्या मुलाने सिंगरौलीत बसून स्वत:चं लोकेशन युएई असल्याचं दाखवलं. त्यानतंर भारतात बंदी असलेली अॅप्स त्याने डाऊनलोड करून घेतली. नंतर मुलगी बनून व्हॉटसअॅपवर लोकांसोबत चॅटिंग केलं. त्यातून समोरच्या व्यक्तींचे मोबाइळ हॅख करून खासगी डेटा गोळा केला. त्यानंतर लोकांना ब्लॅकमेल करून त्यांच्याकडून पैसे उकळले.

हेही वाचा: शाळेत 'तक्रार पेटी' ठेवा; POSCO प्रकरणात कोर्टाचे निर्देश

एका तरुणाने पोलिसात तक्रार दिली की, प्रियांका नावाची मुलगी त्याला ब्लॅकमेल करत असून पैशांची मागणी केली जात आहे. तसंच त्या तरुणाने असंही सांगितलं की, शेजारी राहणारा मुलगा सॉफ्टवेअरच्या माध्यमातून ब्लॅकमेल करणाऱ्याकडून डेटा पसरवणं थाबवत होता. मात्र आता ते शक्य नसल्याचं तरुणाने सांगितलं.

पोलिसांनी याप्रकरणी सायबर एक्सपर्टचा सल्ला घेतला. तेव्हा अशी माहिती समजली की, जो मुलगा सॉफ्टवेअरच्या माध्यमातून ब्लॅकमेल करणाऱ्याचा डेटा पसरवणं थांबवत होता तोच महिला बनून ब्लॅकमेल करत आहे. त्यानंतर पोलिसांनी मुलाची कसून चौकशी केली.

हेही वाचा: पेगॅसस प्रकरणी विरोधकांचा गोंधळ; चार मिनिटातच लोकसभा स्थगित

भारतात बंदी असलेल्या अॅपला एका थर्ड पार्टी अॅपच्या माध्यमातून डाऊनलोड केलं होतं. त्यावर खोटं व्हॉटसअॅप अकाउंट तायर करून अनेक लोकांना आपल्या जाळ्यात ओढलं होतं. लोकांना ब्लॅकमेल करत त्यांच्याकडून पैशांच्या मागणी करायचा. त्याच पैशांमधून त्याने डार्क वेबच्या माध्यामातून हॅकिंग सॉफ्टवेअरसुद्धा विकत घेतलं होतं. सध्या पोलिस त्याच्याकडून आणखी काही माहिती मिळते का हे बघत आहेत.

loading image