बिहारमध्ये एनडीए २०० जागा जिंकेल : नितीशकुमार 

nitishkumar
nitishkumar

पाटणा : जनता दल (युनायटेड) पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे अभिन्न अंग असून, आगामी विधानसभा निवडणुकीत २०० हून जागा जिंकण्याचा विश्‍वास रविवारी (ता.१) बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी व्यक्त केला.

जेडीयूच्या कार्यकर्ता संमेलनात बोलताना नितीशकुमार म्हणाले की, बिहारच्या नागरिकांनी आपल्याला २००५ मध्ये संधी दिली आणि तेव्हापासून राज्याच्या विकासासाठी काम करीत आहोत. जी मंडळी आपल्या कामाबाबत प्रश्‍न विचारत आहेत, त्यांना लवकरच मतपेटीतून उत्तर देऊ, असेही ते म्हणाले. 

पाटणा येथे आयोजित संमेलनात बोलताना सीएए आणि एनआरसीसंदर्भातील स्थायी समितीत राजदचे नेते लालूप्रसाद यादव यांचाही समावेश होता, अशी माहिती नितीशकुमार यांनी सभेतून उपस्थितांना दिली. एनपीआरवरून विधानसभेत प्रस्ताव आणला होता आणि २०१० च्या आधारावरच एनपीआर लागू होईल.

बिहारमध्ये एनसीआर लागू होणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात नितीशकुमार यांनी विधानसभा निवडणूक एनडीएसमवेतच लढण्याची घोषणा करीत २०० पेक्षा अधिक जागा मिळतील, असा विश्‍वास व्यक्त केला. सीएएचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात गेला असून, न्यायालयाच्या निकालाची वाट पाहवी.

या मुद्द्यावरून अकारण तणाव निर्माण होऊ नये. काहींना १९४७ पूर्वीचे वातावरण तयार करायचे आहे. मात्र, अशी स्थिती कदापि होऊ देणार नाही. भारत एकसंध होता आणि तो एकसंधच राहील, असेही ते म्हणाले. या वेळी नितीशकुमार यांनी तेजस्वी यादव यांच्यावर डोमिसाईल नीती लागू करण्याच्या मागणीवर टीका केली. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शुभेच्छा 

बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. तळागळातील नागरिकांशी नाळ जोडणारा लोकप्रिय नेता, असे मोदी यांनी शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.

बिहारच्या विकासाचा सतत ध्यास बाळगणारे नितीशकुमार यांना दीर्घायुष्य लाभो, अशी मनोकामना मोदी यांनी व्यक्त केली आहे. नितीशकुमार यांनी आज ६९वा वाढदिवस साजरा केला. यानिमित्त जेडीयूच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com