Delhi Crime News : लोकसभेचं तिकीट देतो म्हणत २२ वर्षाच्या पोराने बड्या नेत्याला ५० लाखांना गंडवलं!

या पोराने काही मोठमोठ्या अधिकाऱ्यांचीही फसवणूक केली आहे.
Delhi Crime News
Delhi Crime NewsGoogle

Delhi Crime News : दिल्ली पोलिसांनी लोकांना बनावट कॉल करून त्यांना फसवणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश केला आहे. आरोपींनी अनेक मोठ्या अधिकाऱ्यांसह एका नेत्यालाही ५० लाखांचा चुना लावला आहे. एका राज्याच्या मुख्यमंत्री ऑफिसच्या फोनचं स्पुफिंग करून आरोपींनी ही फसवणूक केली आहे.

हा गुन्हा करण्यासाठी आरोपी एक स्पूफिंग अॅप वापरत होते. आधी हे वेबसाईट्सवरुन अधिकारी, तसंच नेत्यांचे नंबर मिळवायचे आणि मग मुख्यमंत्री ऑफिसचा नंबर शोधून अॅपच्या साहाय्याने फोन करायचे. आरोपी ज्याला फोन करायचे त्याला मुख्यमंत्री ऑफिसचाच नंबर दिसायचा. त्यामुळे अनेकजण या टोळीच्या जाळ्यात अडकले.

Delhi Crime News
Pune Crime: महिलांनी मारलं म्हणून अपमान झाला अन् "त्याने" खाणीत उडी मारून दिला जीव

पोलिसांनी केलेल्या तपासात आढळलं की, आरोपींनी एका नेत्याला २०२४ चं तिकीट देण्याच्या बहाण्याने फसवलं. या नेत्याकडून त्यांनी ५० लाख रुपये अॅडव्हान्स म्हणूनही घेतले. त्यानंतर आरोपींनी त्याला क्रिप्टोमध्ये कन्वर्ट केलं आणि वॉलेटमध्ये सेव्ह करून ठेवलं. (Latest Marathi News)

पोलिसांना आरोपींकडून मिळालेल्या वॉलेटमध्ये ५९ हजार अमेरिकी डॉलर होते. पोलिसांनी ही रक्कम जप्त केली आहे. काही दिवसांपूर्वी आरोपींनी एका आयपीएस अधिकाऱ्याला फोन करून तीन बदल्या करण्याबद्दल सांगितलं होतं.

पण या अधिकाऱ्याला यांच्यावर शंका आली आणि त्याने थोडी चौकशी केली. तेव्हा हा फोन मुख्यमंत्री कार्यालयातून आलेला नाही, हे लक्षात आलं.

Delhi Crime News
Crypto Crime News : खंडणीसाठी 23 वर्षीय 'क्रिप्टो किंग'चं अपहरण; मारहाण करून केला छळ

पोलिसांनी या प्रकरणी २२ वर्षीय हिमांशू सिंह, जस्टीन मोहनलाल परेरा, दशरथ मकवाना आणि नरेश कुमार यांना ताब्यात घेतलं आहे. यासाठी पोलिसांनी अनेक ठिकाणी छापे मारले आहे. सध्या सगळे आरोपी पोलीस कोठडीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com