

नवी दिल्ली : मुंबईवर २६/११ रोजी झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणा याचे अखेर अमेरिकेतून भारतात प्रत्यार्पण झाले आहे. विमानातून त्याला पालम विमानतळावर आणण्यात आल्यानंतर राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) अटक केली. वैद्यकीय तपासणीनंतर राणा याला ‘एनआयए’च्या कार्यालयामध्ये नेण्यात आले.