Delhi Accident News: लग्नावरून घरी परतताना काळाचा घाला! ट्रक आणि कारच्या धडकेत 3 जणांचा मृत्यू, 4 जण गंभीर जखमी

Delhi Accident News: दिल्लीतील बदरपूर उड्डाणपुलावर ट्रक आणि कारची धडक झाल्याने भीषण अपघात झाला आहे. यामध्ये 3 जणांचा मृत्यू झाला असून 4 जणांची प्रकृती गंभीर आहे. जखमींवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
Delhi Accident News
Delhi Accident NewsEsakal

Delhi Accident News: दिल्लीतील बदरपूर फ्लायओव्हरवर ट्रक आणि कारची धडक झाली. या अपघातात कारमधील तिघांचा मृत्यू झाला, तर चार जण गंभीर जखमी झाले आहे. त्यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे.

दिल्लीतील बदरपूर उड्डाणपुलावर शनिवारी मध्यरात्री ट्रक आणि अल्टो कारमध्ये भीषण धडक झाली. या अपघातात कारमधील तिघांचा मृत्यू झाला, तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांनी जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. त्याचबरोबर मृतांचे मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले आहेत. मृत तिघेही एकाच वसाहतीतील रहिवासी असून फरिदाबाद येथे एका लग्न समारंभातून घरी परतत होते. अपघाताच्या वेळी कारमध्ये एकूण 7 जण प्रवास करत होते.

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री 12:48 वाजता बदरपूर पोलिस स्टेशनला एक पीसीआर कॉल आला, ज्यामध्ये कॉलरने माहिती दिली की होंडा शोरूमजवळील बदरपूर फ्लायओव्हरवर कार आणि ट्रकची धडक झाली आहे. कार क्रमांक UP85B27334 फरीदाबाद येथे एका लग्न समारंभातून घरी परतत असल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे.

Delhi Accident News
Hadapsar News : कार पार्किंग करताना झालेल्या अपघातात महिलेचा मृत्यू; तर एक महिला जखमी

कारमध्ये 7 जण होते. त्यापैकी ३ जणांचा मृत्यू झाला आहे, तर एकाची प्रकृती गंभीर आहे. बदरपूर उड्डाणपुलावर कार चालकाचे नियंत्रण सुटले आणि कार दुभाजकाला धडकून विरुद्ध दिशेने जात NL01AD8898 क्रमांकाच्या ट्रकला धडकली. त्यनंतर हा भीषण अपघात झाला. त्यानंतर सर्व सात जणांना एम्सच्या ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे.

पोलिसांनी सांगितले की, सर्व जखमी अल्टो कारमधून प्रवास करत होते आणि त्यांचे नातेवाईक सोहन लाल यांच्या लग्नाच्या रिसेप्शनला उपस्थित राहण्यासाठी हरकेश नगर पल्ला फरिदाबाद येथे येत होते.

Delhi Accident News
Solapur News : विद्यार्थ्यांचा जीव मुठीत ; गतिरोधक नसल्याने अपघाताचा धोका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com