पाकिस्तानी अधिकारी भारतातून करत होते हेरगिरी; मग भारतानं केलं असं काही....

वृत्तसंस्था
Monday, 1 June 2020

पाकिस्तानी उच्चायोगातील तीन कर्मचाऱ्यांना भारताविरोधात हेरगिरी करत असताना अटक केली आहे. लष्करी गुप्तचर यंत्रणा आणि दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने हे ऑपरेशन केलं. चोरलेल्या दस्तावेजांची देवाणघेवाण करताना या तिघांना अटक करण्यात आली आहे.

नवी दिल्ली : पाकिस्तानी उच्चायोगातील तीन कर्मचाऱ्यांना भारताविरोधात हेरगिरी करत असताना अटक केली आहे. लष्करी गुप्तचर यंत्रणा आणि दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने हे ऑपरेशन केलं. चोरलेल्या दस्तावेजांची देवाणघेवाण करताना या तिघांना अटक करण्यात आली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

अबिद हुसैन, ताहीर खान आणि जावेद हुसैन अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नाव असून ते थेट आयएसआयच्या संपर्कात होते. आयएसआय पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आहे. या कारवाईमुळे आधीपासूनच खराब असलेल्या भारत-पाकिस्तान संबंधात आणखी तणाव निर्माण झाला आहे. परराष्ट्र मंत्रालयाने यातील दोघांना तात्काळ देश सोडण्याचा आदेश दिला आहे.
------
कोरोनाग्रस्तांच्या यादीत भारत आता सातव्या स्थानी; कोणाला टाकले मागे?
------
आंदोलन चिघळले; ट्रम्प व्हाईट हाऊसमल्या संरक्षण बंकरमध्ये हलविले
------
राजनैतिक दूतावासाशी संबंधित असूनही पदाला न शोभणारे, विसंगत कार्य केल्याबद्दल दोघांनाही २४ तासांच्या आत देश सोडण्याचे आदेश भारताकडून देण्यात आले आहेत. परराष्ट्र मंत्रालयाने ही माहिती दिली आहे. भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेला बाधा निर्माण करणारी कृती केल्याबद्दल भारताने पाकिस्तानकडे निषेध नोंदवला आहे. या प्रकरणी ऑफिशिअल सिक्रेट कायद्यातंर्गत एफआयआरही नोंदवण्यात आला आहे. नेहमीप्रमाणे पाकिस्तानने हेरगिरीचे आरोप फेटाळले आहेत. राजनैतिक अधिकाऱ्यांची हकालपट्टी हे विएन्ना कराराचे उल्लंघन असल्याचेही पाकिस्तानने म्हटले आहे. दरम्यान, यापूर्वीही २०१६ साली पाकिस्तानच्या राजनैतिक अधिकाऱ्यांची हेरगिरी प्रकरणावरुन हकालपट्टी करण्यात आली होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 3 Pakistan mission staffers caught spying 2 of them expelled