Coronavirus : कनिकामुळे अख्ख्या अपार्टमेंटची करावी लागली कोरोना टेस्ट!

वृत्तसंस्था
मंगळवार, 24 मार्च 2020

आतापर्यंत १६२ लोक कनिकाच्या संपर्कात आले होते. त्यापैकी ६३ लोकांचे कोरोनाचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.

नवी दिल्ली : बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायिका 'बेबी डॉल' फेम कनिका कपूर ही सध्या कोरोना व्हायरसने ग्रस्त असून हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे. लंडनहून परतल्यानंतर तिने कोणतीही तपासणी केली नव्हती. तिच्यामुळे अनेकांना संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने तिच्याशी संपर्कात आलेल्या सर्वांची टेस्ट करण्यास सुरवात झाली आहे. 

बातम्या वाचण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

त्यामुळेच कनिका राहत असलेल्या अपार्टमेंटमधील सर्वांची कोरोना टेस्ट घेण्यात आली आहे. १३ मार्चला कल्पना टॉवरमध्ये कनिका राहायला आली होती. या दरम्यान ती एका पार्टीतही सहभागी झाली होती. ती राहत असलेल्या अपार्टमेंटमध्ये ३५ लोक राहत असून त्या सर्वांची कोरोना टेस्ट घेण्यात आली. त्यापैकी ११ जणांचे रिपोर्ट हे निगेटिव्ह आले आहेत. तर इतर २४ जणांचे रिपोर्ट येणे बाकी आहे. 

- Coronavirus : ...अन् 'त्या' व्यक्तीचा अंत्यविधी गावकऱ्यांनी रोखला!

लंडनहून परतल्यानंतर कनिकाने तपासणी करून होम क्वॉरन्टाईन करून घ्यायला पाहिजे होते, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. मात्र, ती आई-वडिलांना भेटली. त्यानंतर लखनऊ येथील ताज हॉटेलमध्ये राहिली. त्यानंतर आदेश शेठ यांनी आयोजित केलेल्या एका पार्टीतही तिने उपस्थिती लावली होती. या पार्टीला वसुंधरा राजे, दुष्यंत सिंह, उत्तर प्रदेशचे आरोग्यमंत्री जय प्रकाश सिंह, संजय मिश्रा आदी उपस्थित होते. त्या सर्वांनी आता स्वत:ला होम क्वॉरन्टाइन करून घेतलं आहे. 

- ... म्हणून डॉक्टरांनी सगळी ऑपरेशन्स पुढे ढकलली!

कनिकाला कोरोना झाल्याचे समजल्यानंतर आणि तिचा हा हलगर्जीपणा समोर आल्यावर नेटकऱ्यांनी तिच्यावर चांगलीच टीकेची झोड उठवली होती. निष्काळजीपणाने वागल्याबद्दल तिला अनेकांनी ट्रोल केलं होतं. आतापर्यंत १६२ लोक कनिकाच्या संपर्कात आले होते. त्यापैकी ६३ लोकांचे कोरोनाचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. दरम्यान, बेजबाबदार वागणुकीमुळे कनिकाविरोधात उत्तर प्रदेशातील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

One of my Favs @studioverandah #kanikakapoor x #verandah

A post shared by Kanika Kapoor (@kanik4kapoor) on

- भीलवाडामध्ये कोरोना तिसऱ्या टप्प्यापर्यंत पोहोचला कसा? किती खरं किती खोटं?


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 35 peoples has undergo corona test of the apartment where Singer Kanika Kapoor lives